नवी दिल्ली : जागतिक पातळीवर किमतींमध्ये घसरण झाल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १५0 रुपयांनी उतरून ३0 हजार रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी मात्र, ४३,८५0 रुपये किलो या भावावर स्थिर राहिली.
जागतिक बाजारात डॉलर मजबूत होत असल्यामुळे गुंतवणूकदारांनी सोने खरेदीऐवजी डॉलर खरेदीकडे मोर्चा वळविला आहे. त्यातच स्थानिक बाजारातील मागणीही घटली आहे. या सर्वांचा परिणाम सोन्याच्या
किमतींवर झाला आहे. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.३0 टक्क्याने घसरून १,२४४.१0 डॉलर प्रति औंस झाले. चांदी 0.0३ टक्क्याने घसरून १८.२९ डॉलर प्रति औंस झाली.
दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव १५0 रुपयांनी घसरून अनुक्रमे ३0,000 रुपये आणि २९,८५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. काल सोने २५ रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,५00 रुपये प्रति नग असा स्थिर राहिला.
तयार चांदी ४३,८५0 रुपये या भावावर स्थिर राहिली. साप्ताहिक डिलिव्हरीची चांदी मात्र, ११0 रुपयांनी उतरून ४३,१५0 रुपये किलो झाली. चांदीच्या शिक्क्यांचा भावही खरेदीसाठी ७४ हजार रुपये आणि विक्रीसाठी ७५ हजार रुपये शेकडा असा स्थिर राहिला.
सोन्याचा भाव १५0 रुपयांनी उतरला
जागतिक पातळीवर किमतींमध्ये घसरण झाल्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने १५0 रुपयांनी उतरून ३0 हजार रुपये प्रति १0 ग्रॅम झाले
By admin | Published: March 2, 2017 03:57 AM2017-03-02T03:57:48+5:302017-03-02T03:57:48+5:30