Lokmat Money > बिझनेस न्यूज > Breaking: सोन्याच्या दरात 2600 रुपयांची ऐतिहासिक घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Breaking: सोन्याच्या दरात 2600 रुपयांची ऐतिहासिक घसरण; जाणून घ्या आजचे भाव

सोन्याच्या भावात 2600 रुपयांची घसरण झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 10:18 AM2020-03-13T10:18:31+5:302020-03-13T10:39:48+5:30

सोन्याच्या भावात 2600 रुपयांची घसरण झाली आहे. सोने आणि चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली आहे. 

Gold prices fall by Rs 2600; Find out today's rates vrd | Breaking: सोन्याच्या दरात 2600 रुपयांची ऐतिहासिक घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Breaking: सोन्याच्या दरात 2600 रुपयांची ऐतिहासिक घसरण; जाणून घ्या आजचे भाव

Highlightsकोरोना आणि मंदीच्या प्रभावाने आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे भावही शेअर बाजारात उघडताच पडले आहेत. सोन्याच्या भावात 2600 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 41,556.00 रुपयांवर आला आहे. तर चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली आहे. 

नवी दिल्लीः कोरोना व्हायरसनं जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे अनेक देशातल्या शेअर बाजारांमध्ये घसरण झाली आहे. कोरोना आणि मंदीच्या प्रभावाने आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्याचे भावही शेअर बाजारात उघडताच पडले आहेत. सोन्याच्या भावात 2600 रुपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा भाव 41,556.00 रुपयांवर आला आहे. तर चांदीच्या दरातही घसरण नोंदवली गेली आहे. 

कोरोनाचा प्रभाव सोन्याच्या भावावर सर्वाधिक पडला आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे सोने अन् चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदवली गेली आहे. गुरुवारी सोने 128 रुपयांनी स्वस्त होऊन त्याचा भाव 44 हजार 490 रुपयांवर आला होता. तसेच चांदी 302 रुपयांनी स्वस्त होऊन भाव किलोला 46 हजार 868 रुपये झाला होता.

कमॉडिटी बाजारात (MCX) सोन्याच्या दरात 58 रुपयांची घट झाली होती. सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 43 हजार 297 रुपयांपर्यंत खाली आला होता. चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली. चांदीचा भाव 613 रुपयांनी वधारला आणि 45312 रुपयांवर आला होता. काल मुंबईत सराफा पेढींवरही सोन्याचा दर दहा ग्रॅमला 43200 रुपये झाला होता. तर त्यामध्ये77 रुपयांची वाढ झाली होती. बुधवारी सोने 516 रुपयांनी स्वस्त झाले होते. दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमला 44490 रुपये झाला होता.
 

Web Title: Gold prices fall by Rs 2600; Find out today's rates vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं