नवी दिल्ली : मागणी ओसरल्यामुळे सोमवारी सराफा बाजारात मंदीची चाल दिसून आली. ४१0 रुपयांनी घसरलेले सोने २७,७९0 रुपये तोळा झाले. हा सोन्याचा दोन आठवड्यांचा नीचांक ठरला.
चांदीचा भाव तब्बल ८२0 रुपयांनी खाली आला. औद्योगिक क्षेत्र तसेच शिक्के निर्मात्यांकडून असलेली मागणी घटल्यामुळे चांदी ३७,५३0 रुपये किलो झाली.
व्यापाऱ्यांनी सांगितले की, किरकोळ विक्रेते आणि दागिने निर्माते यांच्याकडून असलेली सोन्याची मागणी घटली. त्याचबरोबर जागतिक बाजारातही सोन्याचा भाव घसरला. अशा प्रकारे दुहेरी माऱ्यामुळे राजधानी दिल्लीतील सराफा बाजार उतरला. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरणी सराफ्यावर परिणाम करून गेली. भारतातील सराफा बाजारावर परिणाम करणाऱ्या न्यूयॉर्क येथील बाजारात सोन्याचा भाव २.४७ टक्क्यांनी उतरून १,२३३.३0 डॉलर प्रतिऔंस झाला. जानेवारीत अमेरिकेतील रोजगार बाजारात सुधारणा झाल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे अमेरिकी फेडरल रिझर्व्ह २00६ नंतरची पहिली व्याजदर कपात करू शकते, असे मानण्यात येत आहे.
सोने ४१0 रुपयांनी झाले स्वस्त
मागणी ओसरल्यामुळे सोमवारी सराफा बाजारात मंदीची चाल दिसून आली. ४१0 रुपयांनी घसरलेले सोने २७,७९0 रुपये तोळा झाले.
By admin | Published: February 9, 2015 11:49 PM2015-02-09T23:49:19+5:302015-02-09T23:49:19+5:30