नवी दिल्ली : सराफा बाजारातील दोन दिवसांच्या तेजीला ब्रेक लागला असून, सोने ७0 रुपयांनी उतरून २६,५00 रुपया तोळ्यावर आले. चांदी मात्र आदल्या दिवशीच्या पातळीवर ३६,000 रुपये किलो, अशी कायम राहिली.जागतिक बाजारात नरमाईचा कल असल्यामुळे सोने उतरले आहे. तसेच रुपयाच्या तुलनेत डॉलर मजबूत झाल्याचा परिणामही बाजारावर दिसून आला. भारतातील सराफा बाजाराचा कल ठरविणाऱ्या सिंगापूर येथील बाजारात सोन्याचा भाव 0.३ टक्क्याने उतरून १,१६७.१४ डॉलर प्रति औंस झाला. चांदीचा भाव 0.४ टक्क्याने उतरून १५.६८ डॉलर प्रति औंस झाला. तयार चांदीचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर ३६,000 रुपये किलो असा राहिला. साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव मात्र ५0 रुपयांनी वाढून ३६,000 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव आदल्या दिवशीच्या पातळीवर खरेदीसाठी ५४ हजार रुपये शेकडा आणि विक्रीसाठी ५५ हजार रुपये शेकडा असा कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)-----> राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ७0 रुपयांनी उतरून अनुक्रमे २६,५00 रुपये आणि २६,३५0 रुपये तोळा झाला. > गेल्या दोन सत्रांत सोने ७0 रुपयांनी वाढले होते. ही वाढ एकाच दिवसांत गेली आहे. सोन्याच्या आठ ग्रॅमच्या गिन्नीचा भाव मात्र २३,३00 रुपये, असा स्थिर राहिला. > सोन्याचा भाव अलिकडे मोठ्या प्रमाणात अस्थिर झाला आहे.
सोन्याचा भाव उतरला; चांदी स्थिर
By admin | Published: July 07, 2015 10:52 PM