Join us

'सुवर्णसंधी'; सोन्याचे दर घसरले, चांदीही 1500 रुपयांनी स्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2019 6:12 AM

लग्नसराईची लगबग सुरू होताच, सोने-चांदीच्या खरेदीला पुन्हा वेग आला आहे.

जळगाव : लग्नसराईची लगबग सुरू होताच, सोने-चांदीच्या खरेदीला पुन्हा वेग आला आहे. गेल्या १० दिवसांत सोन्याचे भाव ८०० रुपये प्रती तोळ्याने कमी झाले आहेत. सोने ३९ हजार १०० रुपये प्रती तोळ्यावरून ३८ हजार ३०० रुपयांवर आले आहेत, तसेच चांदीचेही भाव ४६ हजार ५०० रुपयांवरून ४५ हजार रुपये प्रती किलोवर आले आहेत.दरवर्षी लग्नसराईनंतर आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोने-चांदी खरेदी कमी होऊन भावही गडगडतात. यंदाचे वर्ष यास अपवाद ठरले. आॅगस्ट व सप्टेंबरपासून कधी नव्हे एवढे भाव वाढून खरेदीचाही उत्साह राहिला. त्यात नवरात्रौत्सवापासून सोने-चांदी खरेदीला अधिक वेग आला. दिवाळीमध्ये प्रत्येक मुहूर्तावर सोने खरेदीसाठी गर्दी होती.तुळशी विवाहानंतर ‘लगीनघाई’ सुरू होणार असल्याने सोने-चांदी घेणे सुरू आहे. विवाह तिथी जवळ आल्यानंतर गर्दी अधिक वाढण्याची शक्यता असल्याने अनेक जण अगोदरच दागिन्यांची खरेदी करून ठेवत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.>भावात घसरणअमेरिकन डॉलरचे दर वाढले असले तरी सोन्या-चांदीच्या भावात घसरण होत आहे. २ नोव्हेंबर रोजी अमेरिकन डॉलरचा दर ७०.५२ रुपये असताना त्या दिवशी सोन्याचे भाव ३९ हजार १०० रुपये प्रती तोळा होते तर चांदीचे भाव ४६ हजार ५०० रुपये प्रती किलो होते.मात्र त्यानंतर डॉलरचे भाव वाढत जाऊन १२ नोव्हेंबरला ते ७१.७४ रुपयांवर पोहचले. यात सोन्याचे भाव ८०० रुपये प्रती तोळ््याने कमी होऊन ते ३८ हजार ३०० रुपयांवर तर चांदीचे भाव दीड हजार रुपये प्रती किलोने कमी होऊन ते ४५ हजार रुपये प्रती किलोवर आले आहेत.

टॅग्स :सोनं