Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याचे दर घसरले; सराफाबाजारात ग्राहकांची गर्दी, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

सोन्याचे दर घसरले; सराफाबाजारात ग्राहकांची गर्दी, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर हे गगनाला भिडले होते. सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर गेले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:15 PM2023-07-12T12:15:55+5:302023-07-12T12:17:16+5:30

जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर हे गगनाला भिडले होते. सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर गेले होते.

Gold prices fell; Crowd of customers in bullion market, know today's latest rate | सोन्याचे दर घसरले; सराफाबाजारात ग्राहकांची गर्दी, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

सोन्याचे दर घसरले; सराफाबाजारात ग्राहकांची गर्दी, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

जानेवारी महिन्यात सोन्याचे दर हे ६५ हजारांवर जावून पोहचले होते. तीन ते चार महिन्याच्या काळात या सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. पाच महिन्यांपूर्वी ६५ हजारांवर असलेल्या सोन्याचे भाव ५४ ते ५६ हजारांवर येऊन पोहोचले आहेत. देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावच्या सराफाबाजारातही याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे. सोन्याचे भाव कमी झाल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आहे. 

जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर हे गगनाला भिडले होते. सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर गेले होते. ६५ ते ६६ हजार रुपयांवर सोन्याचे दर जाऊन पोहचले होते. मात्र या चार ते पाच महिन्यांच्या काळात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. देशात लग्नसराई संपली, त्यामुळे विदेशातील सोन्याची सुद्धा मागणी घटली. त्याचा परिणाम हा सोन्याच्या दरावर झाला आहे. जळगावच्या सराफा बाजारातील मंगळवारचे २४ कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅमचे भाव ५९ हजार २०० तर चांदी ७० हजार ७०० रुपये असे भाव आहेत.

२२ कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅमचे भाव ५४ हजार २३० रुपये असे आहेत. हे सर्व दर विना जीएसटीचे आहेत. जीएसटीसहीत हे दर वाढतात. गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याच्या भावाने उच्चांकी गाठली, म्हणजे वरचढून भाव कमी झाले, त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्या देशात जेव्हा मागणी वाढते, तेव्हा भाव वाढतात, असं सराफा व्यावसायिकांनी सांगितलं. तर दर कमी झाल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेले सोन्याचे दरात पुन्हा मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सराफा दुकानांमध्ये ग्राहकांनी सोने खरेदीसाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. ६५ हजारांवरून सोन्याचे दर ५९ हजारांवर येऊन पोहचल्याने आनंद असल्याचे ग्राहकांनी सांगितले. सोन्याचे खरेदींचे प्लॅनिंग होत मात्र भाव जास्त असल्याने खरेदी करता आली, भाव कमी होतील याची प्रतिक्षा होती. आता भाव कमी झाल्याने कमी पैशात जास्त सोने खरेदी करता येत असल्याचे ग्राहकांनी सांगितले. पुन्हा भाव वाढतील म्हणून सोन्यामध्ये सुद्धा काही नागरिक गुंतवणूक करत असल्यानेही दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. 

Web Title: Gold prices fell; Crowd of customers in bullion market, know today's latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.