मुंबई : अबकारी विरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफा बाजार बंद होता. परिणामी, सोने खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले होते; आणि त्यांचा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्तही हुकला होता.
सोमवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहक सोनेखरेदी करतील अशी अपेक्षा आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव ३० हजारांच्या
आसपास आहे. परिणामी, सराफा बाजार थंडावलेला आहे. मात्र मुहूर्त म्हटला तर काही ग्रॅम सोने
खरेदी करण्यासाठी तरी ग्राहकांची
गर्दी होण्याची शक्यता झवेरी बाजारातून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी अक्षय्य तृतीयेला सोन्याचा प्रतितोळा दर हा २६ हजार ९५० रुपये इतका होता.
एक आठवड्याआधी सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३० हजारांचा टप्पा गाठला आहे. असे असले तरी
बाजारात नेहमीच्या मानाने २० ते ३० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
रेकॉर्ड ब्रेक खरेदीकडे सराफांचे लक्ष
गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सोन्याने प्रतितोळा २५ हजार रुपयांचा टप्पा गाठला होता. मात्र बाजारात सोने प्रतितोळा २४ हजारांपर्यंत उतरण्याची चर्चा रंगल्याने ग्राहकांनी खरेदीसाठी अक्षय्य तृतीयेची वाट पाहिली.
मात्र अक्षय्य तृतीयेला सोन्याचा दर २६ हजार ९५० रुपयांवर गेल्यानंतरही ग्राहकांनी खरेदीत उत्साह दाखवला होता. परिणामी गतवर्षी सराफा बाजाराने ७०० कोटींचा गल्ला जमवला होता.
याउलट यंदाही गुढीपाडव्याला दुकाने बंद असल्याने ग्राहकांना सोने खरेदीसाठी अक्षय्य तृतीयेची वाट पाहावी लागली. त्यामुळे या वर्षी किती उलाढाल होईल, याविषयी बाजारात उत्सुकता आहे.
सोन्याचा भाव ३० हजारांवर
अबकारी विरोधात पुकारलेल्या आंदोलनामुळे ऐन गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सराफा बाजार बंद होता. परिणामी, सोने खरेदीसाठी इच्छुक ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले होते
By admin | Published: May 9, 2016 03:38 AM2016-05-09T03:38:40+5:302016-05-09T03:38:40+5:30