Join us  

सोन्याचे दर ‘जैसे थे’ राहणार, मात्र आभूषण निर्मात्यांना होणार लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 3:56 AM

कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचा सुवर्ण व्यावसायावर नव्हेतर, व्यावसायिकांच्या लाभावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

- विजयकुमार सैतवालजळगाव : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचा सुवर्ण व्यावसायावर नव्हेतर, व्यावसायिकांच्या लाभावर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा टॅक्स कमी केला असला तरी सोने-चांदीचे भाव कमी होणार नसून केवळ आभूषणे तयार करणाऱ्या उत्पादकांना त्याचा लाभ होणार आहे. कर कमी करण्याच्या घोषणेनंतर सोन्याचे भाव १०० रुपयांनी वधारून ३७ हजार ८०० रुपयांवर पोहोचले तर चांदी ४७ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहे.भारतात सुवर्ण आभूषणांनाही मोठे महत्त्व असल्याने या व्यवसायातही मोठी उलाढाल होत असते. त्यात सुवर्णनगरी जळगावात हा व्यवसाय मोठा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील मंडळींचा कर भरण्यात मोठा हातभार असतो. त्या अनुषंगाने कॉर्पोरेट टॅक्स कमी केल्याच्या घोषणेनंतर सोने-चांदी व्यवसायाचा आढावा घेतला असता याचा या व्यवसायावर काहीही परिणाम होणार नसल्याचे सुवर्ण व्यावसायिक व या क्षेत्रातील जाणकार ईश्वरलाल जैन यांनी सांगितले.ते म्हणाले, वर्ष अखेर आयकर भरताना त्यावर लागणाºया कॉर्पोरेट टॅक्समध्ये ही कपात करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या वेळी हा कर भरला जाईल, त्या वेळी त्याचा लाभ व्यावसायिकांना होणार आहे. मात्र तोदेखील सर्व सुवर्ण व्यावसायिकांना नाही, तर जे आभूषण तयार करतात, त्यांनाच हा लाभ होईल.>जीएसटी, सीमा शुल्ककमी केल्यास लाभसोन्यावरील जीएसटी व सीमा शुल्क (कस्टम ड्युटी) कमी केले असते, तर सोन्याचे भाव कमी झाले असते व त्याचा ग्राहकांना लाभ झाला असता. केंद्रीय अर्थसंकल्पात सीमा शुल्क वाढविल्याने सोन्याचे भाव वाढले होते. शुक्रवारी कॉर्पोरेट टॅक्स कमी केला असला तरी सोन्याचे भाव १०० रुपयांनी वाढून ते ३७ हजार ७०० वरून ३७ हजार ८०० वर गेले आहेत.

टॅग्स :सोनं