नवी दिल्ली : जागतिक बाजारात नरमाईचा कल असतानाही राजधानी दिल्लीत ज्वेलरांनी केलेल्या खरेदीच्या बळावर सोने १00 रुपयांनी वाढून ३१,२५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. चांदी मात्र १८५ रुपयांनी उतरून ४६,४६५ रुपये किलो झाली. जागतिक बाजारांपैकी प्रमुख बाजार असलेल्या सिंगापुरात सोने 0.५ टक्क्यांनी घसरून १,३४५.८0 डॉलर प्रति औंस झाले. दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १00 रुपयांनीवाढून अनुक्रमे ३१,२५0 आणि ३१,१00 रुपये तोळा झाला.गेल्या तीन सत्रांत सोने १00रुपयांनी वाढले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याचा भाव वाढला; चांदी मात्र उतरली
By admin | Published: August 20, 2016 1:14 AM