नवी दिल्ली : सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी सोन्याच्या भावात सुधारणा नोंदली गेली. राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव २१० रुपयांनी उंचावून २८,३०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. लग्नसराईची मागणी वाढल्याने ही तेजी दिसून आली. चांदीचा भावही २०० रुपयांनी वाढून ३८,६०० रुपये प्रतिकिलो राहिला.सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले की, लग्नसराईच्या काळातली मागणी पूर्ण करण्यासाठी आभूषण निर्माते व किरकोळ व्यापारी यांच्या ताज्या खरेदीमुळे या मौल्यवान धातूंच्या भावात ही वाढ नोंदली गेली. जागतिक बाजारातही तेजीचा कल होता.तयार चांदीचा भाव २०० रुपयांनी वाढून ३८,६०० रुपये, तर चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव ५४० रुपयांनी वधारून ३८,५६५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ६३,००० रुपये, तर विक्रीकरिता ६४,००० रुपये प्रतिशेकडा राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
सोन्याच्या भावात २१० रुपयांनी वाढ
By admin | Published: February 06, 2015 2:34 AM