Join us

सोन्याचा भाव स्थिर; चांदी चकाकली

By admin | Published: July 05, 2014 5:48 AM

ठोस मागणीअभावी शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव २८,४०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर कायम राहिला.

नवी दिल्ली : ठोस मागणीअभावी शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव २८,४०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर कायम राहिला. दुसरीकडे चांदीचा भाव मात्र, औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून झालेल्या चांगल्या मागणीमुळे वधारला.लग्नसराईचा हंगाम नुकताच संपला आहे. ठोस मागणी न झाल्याने सोन्याचा भाव कायम राहिला. तथापि, औद्योगिक संस्था आणि स्टॉकिस्टच्या मागणीने चांदी चमकली.दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव अनुक्रमे २८,४०० आणि २८,२०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर कायम राहिला. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही २४,९०० रुपयांवर कायम होता.तयार चांदीचा भाव ४०० रुपयांनी उंचावून ४५,३०० रुपये प्रतिकिलो आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भावही ३२५ रुपयांनी वाढून ४४,६४५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भाव खरेदीसाठी ७९,००० रुपये आणि विक्रीसाठी ८०,००० रुपये प्रतिशेकड्यावर कायम राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)