Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rate Today: सोन्याच्या दरात महिन्याभरात तब्बल १८०० रुपयांची घट, झटपट जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात महिन्याभरात तब्बल १८०० रुपयांची घट, झटपट जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold Rate Today, 26 March 2021: होळीच्या आधी सोन्याच्या दरात  (Gold rate today) मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 07:14 PM2021-03-26T19:14:28+5:302021-03-26T19:15:26+5:30

Gold Rate Today, 26 March 2021: होळीच्या आधी सोन्याच्या दरात  (Gold rate today) मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.

gold rate 26 march 2021 gold declines 147 rupees today latest rate | Gold Rate Today: सोन्याच्या दरात महिन्याभरात तब्बल १८०० रुपयांची घट, झटपट जाणून घ्या लेटेस्ट दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात महिन्याभरात तब्बल १८०० रुपयांची घट, झटपट जाणून घ्या लेटेस्ट दर

होळीच्या आधी सोन्याच्या दरात  (Gold rate today) मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सोन्याच्या किमतीत आज पुन्हा एकदा घट झाली आहे. मार्च महिन्यात तब्बल १८०० रुपयांहून अधिक दरानं सोनं स्वस्त झालं आहे. या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा दर १४७ रुपयांनी घरसला आहे. सोन्याचा आजचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ४४,०८१ रुपये इतका झाला आहे. (Gold Rate Today 26 March 2021 Latest News)

१ मार्च रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४५ हजार ९२० रुपये इतका होता. दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज चांदीच्या दरात दिल्लीतील सराफा बाजारात १०३६ रुपयांची वाढ झाली. चांदीचा दर प्रतिकिलो ६४ हजार २७६ रुपये इतका झाला आहे. 

MCX वरील एप्रिलसाठीचा सोन्याचा भाव संध्याकाळी ४ वाजता ९७ रुपयांनी घसरून ४४,५९८ रुपयांवर होता. तसेच जूनसाठीचा दर ६७ रुपयांनी घसरून ४५,०४५ रुपयांवर आणि ऑगस्टचा दर २०८ रुपयांनी घसरून ४५३३४ रुपयांच्या पातळीवर आहे. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. एप्रिलसाठीचा सोन्याचा भाव १.३२ डॉलरच्या तेजीसह प्रति औंस १,७२६.४५ डॉलरवर ट्रेंड करत होता.
 

Web Title: gold rate 26 march 2021 gold declines 147 rupees today latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.