Join us

Gold rate: सोन्याच्या दराने गाठला १० महिन्यांतील नीचांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 05:14 IST

गेल्या १० दिवसांमध्ये दोन दिवसांचा अपवाद वगळता, सोन्या-चांदीत सातत्याने घसरण सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने घसरण सुरूच असून, गुरुवार व शुक्रवार असे सलग दोन दिवस मोठी घसरण पाहायला मिळाली. या दोन दिवसांत चांदी तब्बल तीन हजार ५०० रुपयांनी घसरून ६६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. अशाच प्रकारे सोन्यातही एक हजार २०० रुपयांनी घसरण होऊन ते ४५ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर आले. गेल्या १० महिन्यांतील सोन्याचे हे नीचांकी दर असून, ७ मे, २०२० रोजी सोन्याने ४५ हजारांचा पल्ला ओलांडून ते ४६ हजारांवर पोहोचले होते.

गेल्या १० दिवसांमध्ये दोन दिवसांचा अपवाद वगळता, सोन्या-चांदीत सातत्याने घसरण सुरू आहे. दररोज घसरण होत असल्याने सोने मे महिन्यानंतर प्रथमच ४६ हजारांच्या खाली आले आहे. गेल्या वर्षी २०२० मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली होती.

टॅग्स :सोनं