सध्या देशात, 'वन नेशन वन रेट' संदर्भात जबरदस्त चर्चा सुरू आहे. रेट अथवा किंमतीसंदर्भातील हे प्रकरण सोन्याशी संबंधित आहे. खरे तर, सरकार एका अशा धोरणावर काम करत आहे, जे लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात एकाच दरात सोने खरेदी करणे शक्य होईल, असे बोलले जात आहे. तर जाणून घेऊयात काय आहे हे धोरण आणि लागू झाल्यानंतर, सोन्याच्या दरात काय बदल होईल? यासंदर्भात...
काय आहे वन नेशन वन रेट पॉलिसी? -
वन नेशन वन रेट ही केंद्र सरकारची एक प्रस्तावित योजना आहे. हीच्या माध्यमाने संपूर्ण देशात सोन्याचा दर एकसमान करण्यात येणार आहे. अर्थात, ही योजना लागू झाल्यानंतर संपूर्ण देशात एकाच दराने सोने उपलब्ध होईल. आताच्या व्यवस्थेत वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याचा दर थोड्या बहुत प्रमाणात कमी-अधिक असल्याचे बघायला मिळते. महत्वाचे म्हणजे, जेम अँड ज्वैलरी काउंसिलनेही या धोरमास समर्थन दिले आहे. मात्र, सरकार यावर केव्हा पर्यंत निर्णय घेणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
असा ठरेल एकसमान भाव? -
या धोरणांतर्गत सरकार नॅशनल बुलियन एक्सचेंज तयार करू शकते, ज्याद्वारे सोन्याचे दर ठरवले जातील. हे एक्सचेंजच सोन्याचे दर ठरवेल. यामुळे आता ज्वेलर्सना त्यांच्या प्रमाणे सोन्याचे दर ठरवता येणार नाहीत. तसेच सोन्याच्या दरासंदर्भात एक केंद्रीकृत व्यवस्था असेल.
खरंच स्वस्ता होणार सोनं? -
हे धोरण लागू झाल्यानंतर, ज्वेलर्सच्या मनमानी कारभाराला आळा बसेल. ज्वेलर्सना आपल्या मनाप्रमाणे दर वाढवता अथवा कमी करता येणार नाही. एक्स्चेंजने किंमत ठरवल्यानंतर, सध्या ज्या ठिकाणी सोन्याचा दर सर्वाधिक आहे, त्या ठिकाणी दर कमी होण्याची शक्यता आहे. सोन्याचा दर सर्वत्र समान झाल्यानंतर, तो खाली येईल. यामुळे, ज्या शहरांमध्ये सोने महाग आहे तेथे अधिक फरक पडेल, असे मानले जात आहे.