Join us  

Gold Rate Today: सोने-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 6:46 PM

सध्या देशात लग्न सराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते.

सध्या देशात लग्न सराईचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. पण गेल्या काही दिवसापासून सोनं-चांदीचे दर गगनाला भिडले होते. आता सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारपेठेत सोने दरात मोठी घसरण झाली आहे. 

दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव 420 रुपयांनी घसरून 57,554 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. काही दिवसापूर्वी 54,974 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता. सोन्याच्या धर्तीवर चांदीचा भावही 869 रुपयांनी घसरून 68,254 रुपये प्रति किलोवर आला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,788 डॉलर प्रति औंस होता. तर चांदी देखील घसरणीसह 23.14 डॉलर प्रति औंसवर आहे.

गेल्या दोन आठवड्यापूर्वी सोन्यासह चांदीच्या दरातही घट झाली होती. चांदीचे दर 61,075 रुपये प्रति किलो होते. 5 डिसेंबर रोजी येणाऱ्या चांदीची किंमत 0.89 टक्के म्हणजेच 544 रुपयांनी घसरले होते. 60,331 रुपये प्रति किलो ग्रॅम होते. 

TDS क्लेम करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक नाही; जाणून घ्या, कोणत्या करदात्यांना मिळणार 'ही' सूट?

21 नोव्हेंबर रोजी जागतिक बाजारपेठेत सोन्याचे फ्युचर्स आणि स्पॉट किमतीत घसरण झाली होती. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत 0.72 टक्क्यांनी कमी होऊन 1756.20 डॉलर प्रति औंस झाली होती.

टॅग्स :सोनंचांदी