Join us

Gold Rate Today : सोन्या-चांदीचे दर घसरले, घसरतच गेले; झटपट जाणून घ्या आजचा बाजारभाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 11:04 AM

Gold, silver price Today : कोरोनामुळे 7 ऑगस्टला सोन्या-चांदीने कमाल केली होती. नवीन रेकॉर्ड बनविताना आजपर्यंतचा सर्वाधिक दर गाठला होता.

आज सोन्या, चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळत आहे. सोमवारी 49,143 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झालेले सोने आज 240 रुपयांच्या घसरणीवर (Gold Price Fall) उघडले. 48,903 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उघडलेले सोने आज 300 हून अधिक रुपयांनी गडगडले असून आताचे दर 48850 रुपये प्रति तोळा आहेत. 

बाजाराच्या सुरुवातीलाच सोन्याने 48,807 चा स्तर गाठला. सध्या सोन्याच्या दरात 0.60 टक्के म्हणजेच 293 रुपयांची घट झाली आहे. दुसरीकडे जसा सोन्याचा हाल आहे तसाच चांदीचाही झाला आहे. चांदीच्या दरातही मोठी घसरण दिसू लागली आहे. सोमवारी चांदी 66,535 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आज चांदी 304 रुपयांच्या घसरणीने सुरु झाली. चांदीने सुरुवातीला 66,045 रुपये प्रति किलोचा दर गाठला होता. सध्या चांदी 375 रुपयांनी घसरली आहे. 

दिल्लीमध्ये सोमवारी सोन्याच्या दरात घसरण झाली होती. सोन्याचा दर 141 रुपयांनी घसरून 48,509 झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजने याची माहिती दिली. शुक्रवारी सोने 48,650 रुपयांवर बंद झाले होते. तर चांदीमध्ये उलट दिसले होते. चांदीच्या दरात वायदा बाजारात मागमी वाढल्याने 70 रुपयांची वाढ झाली होती. मार्च महिन्याची डिलिव्हरी 66,712 रुपये प्रति किलो झाली होती. 11,716 लॉटचा व्यवहार झाला होता. 

ऑल टाईम हाय पेक्षा कितीने घसरणकोरोनामुळे 7 ऑगस्टला सोन्या-चांदीने कमाल केली होती. नवीन रेकॉर्ड बनविताना आजपर्यंतचा सर्वाधिक दर गाठला होता. 7 ऑगस्टला सोन्याच्या दराने 56,200 रुपये प्रति तोळा उंची गाठली होती. तर चांदीने 77,840 रुपये प्रति किलो चा स्तर गाठला होता. आता सोने या किंमतीपेक्षा जवळपास 7300 रुपये आणि चांदी जवळपा, 11600 रुपयांनी घसरली आहे. 

कसा ठरतो सोन्याचा भाव?डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला होता. कोरोनाच्या अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला होता. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात  मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात  ठरवण्यात आला.

टॅग्स :सोनंचांदीगोल्ड स्पॉट एक्स्चेंज