Join us

Gold Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण; झटपट जाणून घ्या आजचा बाजारभाव...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 12:37 PM

Gold, Silver price fall: गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत 2,700 रुपयांची घसरण झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या रेकॉर्ड स्तरावर गेले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या किंमतीत 9000 रुपयांची घसरण झाली आहे.

Gold Rate today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी सोन्याच्या दरात (Gold Price) मोठी घसरण झाली आहे. MCX वर ऑगस्ट डिलिव्हरीचे सोने आज 116 रुपयांनी घसरत खुले झाले. दुपारी सव्वा बारापर्यंत ही घसरण वाढत गेली. सकाळी 11 वाजता हे सोने 288 रुपयांनी म्हणजेच 0.60 टक्क्यांच्या घसरणीने 47635 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होते. (Gold, silver price fall today in MCX Market)

सकाळच्या सत्रात सोन्याच्या दराने 47,807 उच्चतम आणि 47,602 रुपये खालचा स्तर गाठला होता. दुसरीकडे चांदीच्या दरात ( silver price) देखील घसरण पहायला मिळाली. सप्टेंबर डिलिव्हरीची चांदी 421 रुपयांच्या घसरणीमुळे 68876 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत होती. दुपारी सव्वा बाराच्या सुमारास सोन्याचे दर 325 रुपयांनी घसरले होते. तर चांदीच्या दरात 449 रुपयांची घसरण झाली आहे. 

गेल्या महिन्यात सोन्याच्या किंमतीत 2,700 रुपयांची घसरण झाली होती. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हे सोने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या रेकॉर्ड स्तरावर गेले होते. मात्र त्यानंतर सोन्याच्या किंमतीत 9000 रुपयांची घसरण झाली आहे. सध्याच्या काळात सोन्याच्या दरात खूप उतार चढाव पहायला मिळत आहेत. लॉकडाऊन काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ होत होती. परंतू कोरोना परस्थिती सुधारू लागताच हे दर पुन्हा उतरू लागले आहेत. 

कसा ठरतो सोन्याचा भाव?डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला होता. कोरोनाच्या अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला होता. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात  मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात  ठरवण्यात आला.

सोन्यातील गुंतवणूक आणि मागणीसोन्याचे आकर्षण, म्हणून भारतात मागणीही मागणीअनेक जण सोन्याचे दागिने करून ठेवतातगुंतवणूक म्हणूनही सोने खरेदी केले जातेदरवाढीमुळे सोन्याच्या मागणीत घट झाली होतीआता दर घसरणीमुळे पुन्हा मागणी वाढू लागली आहे 

टॅग्स :सोनंचांदीगोल्ड स्पॉट एक्स्चेंज