गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आली. विशेष म्हणजे गेल्या अनेक महिन्यांत सोन्यामध्ये एवढी मोठी घसरण पाहायला मिळालेली नव्हती. मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स)वर शुक्रवारी सोन्याचा वायदा भाव 238 रुपयांनी घसरून 49,666 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. सोन्यासह चांदीमध्येही घट दिसून आली. चांदी जवळपास 1 टक्क्यांनी घसरून 59,018 रुपये प्रतिकिलो आली आहे. आठवड्याभरात सोन्याच्या किमती दहा ग्रॅमसाठी सुमारे 2 हजार रुपयांनी घसरल्या. तर चांदी प्रति किलो 9,000 रुपयांपेक्षा स्वस्त झाली आहे. ब्रोकरेज हाऊसचे म्हणणे आहे की, सोन्याची किंमत49,250च्या खाली येत आहे, म्हणजे आता ते प्रति 10 ग्रॅम 48,900 ते 48,800 रुपयांच्या दरम्यान व्यापार करेल.जागतिक बाजारात चांदी 15 टक्क्यांनी स्वस्त जागतिक बाजारात सोन्या-चांदीची सर्वात मोठी घसरण मार्चनंतर दिसून आली. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या भावात 4.6 टक्क्यांनी घसरण झाली आहे, तर चांदीही 15 टक्क्यांनी स्वस्त झाली आहे. डॉलरच्या मजबुतीमुळे आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत अनिश्चिततेमुळे मौल्यवान धातूंच्या किमती कमी होत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.वाढती महागाई बनली समस्यासोन्याच्या गुंतवणुकीचे एक कारण म्हणजे वाढत्या महागाईवर परिणाम करण्यास मदत होते. परंतु महागाईत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. गेल्या दोन महिन्यांत डॉलर सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे, ज्याचा परिणाम सोन्याच्या उतरत्या किमतीवर झाला आहे.काही विश्लेषकांचे असेही म्हणणे आहे की, सोन्याच्या किमतीतील ही घसरण काही काळासाठी होईल. वास्तविक अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिश्चितता कायम आहे. दुसरीकडे आर्थिक दृष्टिकोन काही सकारात्मक संकेत देत नाही आणि भौगोलिक-राजकीय तणाव देखील सोन्याच्या मागणीवर परिणाम करीत आहे.अमेरिकेत प्रोत्साहन पॅकेज डॉलरला मजबूत करेलयेत्या काही दिवसांत अमेरिकेत आणखी एक प्रोत्साहन पॅकेज जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे डॉलर आणखी मजबूत होईल. अमेरिकन सरकार सुमारे 2.4 ट्रिलियन डॉलर्सच्या प्रोत्साहन पॅकेजवर काम करत आहे. पुढील आठवड्यापर्यंत याची घोषणादेखील केली जाऊ शकते.
Gold Rate Today : सोने 2000 रुपयांनी झालं स्वस्त, चांदीतही 9000 रुपयांची घसरण, जाणून घ्या आजचे दर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2020 5:14 PM