जर तुम्ही सोने-चांदी खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. परदेशात मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण झाल्याने दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या दरात 408 रुपयांची घसरण झाली असून, 52,847 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
मागील आठवड्यात सोन्याचे दर 53,255 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. देशांतर्गत वायदे बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोमवारी सायंकाळी, 5 डिसेंबर 2022 रोजी डिलिव्हरीसाठीचा सोन्याचे दर 0.40 टक्क्यांनी किंवा 209 रुपयांनी घसरून MCX एक्सचेंजवर 52,379 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
SBI ची मोठी घोषणा, कोट्यवधी शेतकऱ्यांचं उत्पन्न होणार दुप्पट; फटाफट करा हे काम
सोन्यासह चांदीच्या दरातही घट झाली. चांदीचे दर ६१,०७५ रुपये प्रति किलो आहे. ५ डिसेंबर रोजी येणाऱ्या चांदीची किंमत ०.८९ टक्के म्हणजेच ५४४ रुपयांनी घसरले आहेत. ६०,३३१ रुपये प्रति किलो ग्रॅम आहे.
जागतिक बाजारपेठेत सोमवारी सायंकाळी सोन्याचे फ्युचर्स आणि स्पॉट किमतीत घसरण झाली. सोमवारी संध्याकाळी कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.७२ टक्क्यांनी कमी होऊन १७५६.२० डॉलर प्रति औंस झाली. सोन्याची जागतिक स्पॉट किंमत सध्या 1740.73 प्रति डॉलर औंसवर आहे.
जागतिक चांदी बाजारात सोमवारी संध्याकाळी फ्युचर्स आणि स्पॉट किमतींमध्ये घसरण झाली. सोमवारी संध्याकाळी चांदीची जागतिक फ्युचर्स किंमत कॉमेक्सवर 1.68 टक्क्यांनी किंवा 0.36 डॉलर ने कमी होऊन 20.84 प्रति डॉलर औंसवर होती. चांदीची जागतिक स्पॉट किंमत सध्या 1.22 टक्क्यांनी किंवा 0.26 डॉलरने कमी होऊन 20.69 डॉलर प्रति औंसवर आहे.