Join us

24 तासांत 1300 रुपयांनी उतरला सोन्याचा भाव; जाणून घ्या आजचा दर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 4:37 PM

Gold Rate Today: गेल्या आठवड्यात उच्चांकी दर गाठणाऱ्या सोन्याचे भाव खाली आले आहेत.

Gold Rate Today: मागील आठवड्यात सोन्याने उच्चांकी दर गाठला होता. दिवाळीच्या काळात सोन्याचा भाव रॉकेटच्या वेगाने वाढून 61,914 रुपयांवर पोहोचला. पण, गेल्या 24 तासात हा भाव कोसळला. शुक्रवारी सोन्याचा भाव 1300 रुपयांनी घसरला. फेडने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिल्यामुळे ही घसरण दिसून आली. 

24 तासांत सोनं 1300 रुपयांनी स्वस्त झालेगुरुवारी सोन्याचा किमतीने ऑल टाईम हाय 61,900 रुपयांची पातळी ओलांडली. दरम्यान, डिसेंबर महिन्यात होणाऱ्या बैठकीत व्याजदरात वाढ होण्याची शक्यता फेडकडून देण्यात आली होती. त्यामुळे डॉलर निर्देशांक वाढला आणि सोन्याचे भाव खाली उतरले. 24 तासही उलटले नाहीत आणि सोन्याच्या दरात सुमारे 1300 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याचा भाव 60,633 रुपयांच्या खालच्या पातळीवर आला.

शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज बंद झाला, तेव्हा सोन्याचा भाव 60,713 रुपये होता. तर, गुरुवारी सोन्याचा भाव 61,914 रुपयांपर्यंत गेला होता. याचा अर्थ असा की, शुक्रवारी सोन्याचा भाव 1200 रुपयांनी कमी झाला आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव पुन्हा एकदा 61,000 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला, पण त्याहून पुढे जाऊ शकला नाही. गुरुवारी डॉलर निर्देशांकात वाढीचा दबाव स्पष्टपणे दिसून आला.

तज्ञ काय म्हणतात?एचडीएफसी सिक्युरिटीजचे करन्सी कमोडिटी हेड अनुज गुप्ता यांनी सांगितले की, फेडकडून मिळालेल्या संकेतांमुळे सोन्याच्या किमती 1200 रुपयांवरून 1300 रुपयांपर्यंत खाली आल्या. मागणी जास्त आहे, त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याचे संकेत आहेत. मध्यवर्ती बँकांकडून सातत्याने खरेदी होत आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :सोनंव्यवसायगुंतवणूक