Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rate Today : सोन्याचे भाव झाले कमी; चांदीच्या दरातही घसरण, जाणून आजचे भाव

Gold Rate Today : सोन्याचे भाव झाले कमी; चांदीच्या दरातही घसरण, जाणून आजचे भाव

या काळात सोने व चांदीच्या दराने नवीन उच्चांकांची नोंद केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 03:01 AM2020-08-20T03:01:22+5:302020-08-20T03:01:37+5:30

या काळात सोने व चांदीच्या दराने नवीन उच्चांकांची नोंद केली आहे.

Gold Rate Today: Gold prices fall; Silver prices also fell, knowing today's prices | Gold Rate Today : सोन्याचे भाव झाले कमी; चांदीच्या दरातही घसरण, जाणून आजचे भाव

Gold Rate Today : सोन्याचे भाव झाले कमी; चांदीच्या दरातही घसरण, जाणून आजचे भाव

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोने व चांदीच्या दरामध्ये घट झाल्यामुळे राजधानीमध्ये या मौल्यवान धातूंच्या दरामध्ये घट झाली आहे. सोन्याच्या दरामध्ये १० ग्रॅमला ६४० रुपयांनी घट होऊन ते ५४,२६९ रुपयांवर आले. चांदीतही किलोमागे ३११२ रुपयांनी घट होऊन ते ६९,४५० रुपयांवर बंद झाले आहेत. गेला आठवडा दर तेजीमध्ये राहिले. या काळात सोने व चांदीच्या दराने नवीन उच्चांकांची नोंद केली आहे.

तर दोन दिवसांपूर्वीच कोरोनाच्या संकटात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढून भावही वाढलेल्या सोने चांदीच्या भावात कोरोनाच्या लसीची घोषणा होताच मोठी घसरण झाली होती. रशियाने लसीचा दावा करताच सट्टा बाजारातील खरेदीदारांनी विक्रीचा मारा सुरू केला व आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्ण बाजार गडगडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे बुधवार, १२ ऑगस्ट रोजी चांदीत एकाच दिवसात तब्बल बारा हजार रुपये तर सोन्यात चार हजार रुपयांनी घसरण झाली होती.

एमसीएक्सवर ऑक्टोबर महिन्यातील सोन्याच्या वायदा बाजारात 0.18 टक्क्यांची वाढ झाली असून सोने प्रतितोळा 53,370 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. तर, चांदीच्या वायदा बाजारात 0.8 टक्क्यांची वाढ होऊन 69,888 रुपये प्रति किलो झाली आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. पहिल्या आठवड्यात सोन्याचा दर 56,191 प्रति तोळा एवढा झाला होता. तर, गेल्या 4-5 दिवसांपूर्वी चांदी ७५ हजार ५०० रुपयांवरून थेट ६३ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली तर सोने ५५,७०० रुपयांवरून ५१ हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले आहे होते. गेल्या काही दिवसांपासून सट्टेबाजांमुळे अस्थिर झालेल्या सुवर्ण बाजारात याचे परिणाम दिसून येत आहेत. तर, सोने-चांदीच्या भावात अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत आहे.

Web Title: Gold Rate Today: Gold prices fall; Silver prices also fell, knowing today's prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं