Join us

Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:28 AM

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. तर चांदीतही किंचित वाढ झाली आहे. आज सोनं २६० रुपयांनी वधारून ७४२०५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ३३ रुपयांनी वधारून ९०१७७ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली.

आजचा सोन्या-चांदीचा दर

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) २३ सप्टेंबर २०२४ रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आज सोनं आणि चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार दिसून आले. आज सकाळी ९९९ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ७४०९३ रुपये प्रति १० ग्रॅम, ९९५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ७३७९६ रुपये, ९१६ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ६७८६९ रुपये, ७५० शुद्धतेच्या सोन्याचा भाव ५५५७० रुपये आणि ५८५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव ४३३४४ रुपये झालाय. तर चांदीचा भाव आज ८८९१७ रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

शहरात २२ कॅरेट आणि २४ कॅरेट सोन्याचे दर

दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ७७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम, तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ५६,१६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर मुंबईत २२ कॅरेट सोन्याचे दर ६८४९० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचे दर ७४,७२० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा दर ६८,४९० रुपये, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७४,७२० रुपये आहे. लखनौ, गाझियाबाद, नोएडा, अयोध्या, गुरुग्राम या ठिकाणी २२ कॅरेट सोन्याचा दर ६८६४० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर ७५८७० रुपये आहे.

टॅग्स :सोनंचांदी