Join us

Gold Rate Today : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्यानं गाठला उच्चांक; चांदीची चमकही वाढली, खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 1:38 PM

Gold Rate Today 29 October: धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच आज  सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Rate Today) सोमवारच्या बंद भावाच्या तुलनेत आणखी वाढला. पाहूया काय आहेत लेटेस्ट दर.

Gold Rate Today 29 October: धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजेच आज  सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव (Gold Rate Today) सोमवारच्या बंद भावाच्या तुलनेत ६०१ रुपयांनी वाढून ७८८४६ रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरात (silver price today) मात्र प्रति किलो ११५२ रुपयांनी वाढ झाली आहे. सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएने जारी केले आहेत. यावर जीएसटी (GST) आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असू असतो.

यंदा सोनं (gold price) प्रति १० ग्रॅम १५४९४ रुपयांनी महागलं आहे. आयबीजेएनुसार, १ जानेवारी २०२४ रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत जीएसटीशिवाय ६३३५२ रुपये होती. मात्र, या काळात चांदी ७३३९५ रुपयांवरून ९७२३८ रुपये प्रति किलो झाली आहे. या कालावधीत त्यात २३८४३ रुपयांची वाढ झाली आहे.

१४ ते २३ कॅरेट सोन्याची किंमत

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ५९८ रुपयांनी वाढून ७८७३० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ५५१ रुपयांनी वाढून ७२२२३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ४५१ रुपयांनी वाढला असून तो ४९१३५ रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २८१ रुपयांनी वाढून ४६१५२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ८१२११ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. यामध्ये २३६५ रुपये जीएसटी जोडण्यात आलेत. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ८०८८५ रुपये आहे. ३ टक्के जीएसटीनुसार यात २३५५ रुपयांची भर पडलीये. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ७४३८९ रुपयांवर पोहोचलं आहे. यात २१६६ रुपये जीएसटी म्हणून जोडले आहेत. जीएसटीसह एक किलो चांदीचा (silver price today) भाव १००१५५ रुपयांवर पोहोचलाय.

टॅग्स :सोनंचांदी