गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे घसरत असलेले दर सामान्यांना दिलासा देणारे होते. यामुळे आणखी दर कमी होतील अशा आशेने विवाहेच्छुक सर्वजण डोळे लावून बसले होते. आज या साऱ्यांसाठी काहीशी वाईट बातमी आहे. सोन्याच्या दरात आज वाढ नोंदविली गेली आहे.
एमसीएक्सवर फेब्रुवारी डिलीव्हरीचे सोने (Gold) बुधवारी 94 रुपयांच्या वाढीनंतर 49077 रुपये प्रति तोळा दरावर सुरु झाले. काल हेच सोने 48983 रुपयांवर बंद झाले होते. सकाळी 11 वाजता सोन्याच्या दरात 145 रुपयांची तर 1 वाजता सोन्याच्या दरात 243 रुपयांची वाढ पहायला मिळाली आहे. सध्या सोने 49226 वर ट्रेंड करत आहे. दुपारी सोन्याने 49077 वरून 49244 प्रति तोळा एवढी उंची गाठली होती. तर एप्रिल डिलिव्हरीच्य़ा सोन्याच्या दरात 248 रुपयांची वाढ झाली आहे. हे सोने 49300 रुपयांवर ट्रेंड करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात धातूंच्या किंमती वाढल्याने स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत 198 रुपयांची वाढ झाली. यामुळे सोने 48,480 रुपये प्रति दहा ग्रॅमवर होते. एचडीएफसी सिकयुरिटीजने ही माहिती दिली आहे. सोमवारी सोन्यचा भाव 48,282 रुपये प्रति दहा ग्रॅम होता. चांदीमध्येही मंगळवारी 1,008 रुपयांची प्रतिकिलोमागे वाढ झाली. चांदी मंगळवारी 65,340 रुपयांवर गेली होती.
आज चांदीच्या दरात 474 रुपये प्रति किलोमागे वाढ झाली आहे. यामुळे चांदी 66510 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत होती. काल चांदी 66036 रुपयांवर बंद झाली होती. आज बाजार उघडताना चांदीचा दर 66181 रुपयांवर सुरु झाला होता. चांदीने 66644 रुपये प्रति किलो एवढा उच्चतम दर गाठला होता. हे दर 5 मार्चच्या डिलिव्हरीचे आहेत.
सोन्याचे दर 8000 रुपयांनी घसरले...सोन्याच्या दरांमध्ये गेल्या पाच महिन्यांत मोठी घट दिसून आली आहे. पाच फेब्रुवारीच्या सोन्याच्या वायदा भावात सात गेल्या ऑगस्टला मोठी उच्चांकी वाढ पहायला मिळाली होती. या सत्रात फेब्रुवारी, 2021 चा वायदा भाव 57,100 रुपयांवर बंद झाला होता. हा दर आताच्या दराशी पडताळला असता सध्याचा सोन्याचा दर त्या दराच्या तुलनेत 8,000 रुपयांनी कमी झाला आहे.
कसा ठरतो सोन्याचा भाव?डॉलरची किंमत दिवसेंदिवस वाढत जात आहे, त्यामुळे सोन्याच्या भावाने ४५ हजारांचा टप्पा कधीच पार केला होता. कोरोनाच्या अशा परिस्थितीत लोकांचा सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे कल वाढला होता. विशेष म्हणजे सोन्याचा भाव जगातील कोणतेही सरकार ठरवत नाही. भाव ठरवण्याचा कोणताही कायदेशीर मार्ग नाही. सोन्याचा भाव केवळ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असतो. बरोबर शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१९ साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचे भाव निश्चित करण्याची पद्धत सुरू केली. लंडनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. दशमान पद्धत आल्यानंतर सोन्याचा भाव ग्रॅमच्या स्वरूपात ठरवण्यात आला.