Join us

सोन्याला पुन्हा झळाळी; काय आहे आजचा सोन्याचा भाव? जाणून घ्या...

By मोरेश्वर येरम | Published: January 22, 2021 1:58 PM

आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडी आणि अमेरिकेतील सत्तांतरणामुळे सेन्सेक्सलाही चांगली उसळी मिळाली आहे. जाणून घ्या आजचा सोन्याचा दर

ठळक मुद्देसोन्याच्या दरात आजही पाहायला मिळाली वाढआंतरराष्ट्रीय बाजारात सध्या सकारात्मक वातावरणदेशात २२ आणि २४ कॅरेट सोन्याच्या दरात झाली वाढ

Gold rate today 22 January 2021 : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली सोन्याच्या दरातील वाढ आज पाचव्या दिवशी देखील तशीच कायम आहे. सोन्याच्या दरात आज किंचित वाढ झाली असून २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे (१ तोळं) ४८,६१० रुपये इतका झाला आहे. 

Good Returns वेबसाईटच्या माहितीनुसार प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा मुंबईतील दर ४८,६१० रुपये इतका झाला आहे. गुरुवारपेक्षा यात १० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत काल २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८,६०० रुपये इतका होता. 

सोनं खरेदी करताय? जरा थांबा! एकदा चार दिवसांतील दर जाणून घ्या...

आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक घडामोडी आणि अमेरिकेतील सत्तांतरणामुळे सेन्सेक्सलाही चांगली उसळी मिळाली आहे. याचाच परिणाम सोन्याच्या दरावरही झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

२४ कॅरेट सोन्याचा दर  काय?देशात २४ कॅरेट सोन्याच्या दरातही तब्बल ७०० रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रम सोन्याचा भाव ५०,३०० रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. गुरुवारी हाच दर ४९,६०० रुपये इतका होता. 

देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा लेटेस्ट दरमुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,६१० रुपये इतका आहे. तर चेन्नईत ४६,६४० रुपये इतका आहे. देशात सर्वात कमी दर आज हैदराबादमध्ये नोंदविण्यात आला आहे. हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४६,१०० रुपये इतका आहे. बंगळुरू, केरळ, भुवनेश्वर, विशाखापट्ट्णम येथीही हाच दर आहे. नाशिक आणि पुण्यात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅममागे ४८,६१० रुपये इतका आहे. 

टॅग्स :सोनंचांदीनिर्देशांकशेअर बाजार