Join us  

Gold Rate Hike: बाबो! सोन्याचा दर थोडाथोडका नव्हे, लाखावर जाणार; दिवाळीत 52 हजार होण्याचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2021 8:18 AM

Gold Rate Double soon: जागतिक बाजारपेठेत आर्थिक अरिष्ट आहे; याचे कारण कोरोना हा साथीचा आजार आहे. शिवाय जागतिक बँका सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जागतिक बाजारपेठेत डॉलरचा भाव खाली वर होत असल्याने दिवाळीमध्ये सोन्याचा भाव प्रति तोळा ५२ हजार रुपये होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारपेठेत आर्थिक अरिष्ट आहे; याचे कारण कोरोना हा साथीचा आजार आहे. शिवाय जागतिक बँका सोन्याची खरेदी करत आहेत. त्यामुळे सोन्याला मागणी आली आहे. याच कारणामुळे ग्राहक सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर करत असून दिवाळीदरम्यान एका दिवसाला मुंबईत सोन्याची खरेदी सुमारे ६०० ते ६५० कोटी रुपये होईल, असा अंदाज सराफ बाजारात वर्तविला जात आहे.  

भारतात सोने आफ्रिका, युरोप, अमेरिकेतून येते. चीनमध्ये सोन्याचा वापर हा १५०० टन आहे. भारतात सोन्याचा वापर ८०० टन आहे. भारतामधील महिलांकडे २५ हजार टन सोने पडून आहे. आता सरकारने सोन्याला हॉल मार्किंग केले आहे. यामुळे सोन्यामध्ये लोकांची गुंतवणूक वाढली आहे, अशी माहिती मुंबई ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष कुमार जैन यांनी दिली. 

भारतात जे ८०० टन सोने येते त्यापैकी ५०० टन सोने दागिने बनविण्यासाठी वापरले जाते. दीडशे टन सोने इंडस्ट्रीमध्ये जाते. बाकीचे सोने डंप होते. डंप म्हणजे कोणी सोन्याची खरेदी ग्रॅमनुसार म्हणजे थोड्या प्रमाणात करते. त्याला डंप असे म्हणतात. म्हणजे हे सोने घेऊन लॉकरमध्ये ठेवले जाते. आता आपण सोने ५० हजार तोळे पाहत आहोत. भविष्यात हा आकडा ६० ते ७० हजार जाऊ शकतो. असे जैन यांनी सांगितले.

येत्या पाच वर्षांत सोने होणार दुप्पटआज सोन्यामध्ये ज्वेलरी यास मागणी आहे. मोती, कुंदन असे यात प्रकार आहेत. काही ग्राहक प्लेन गोल्ड खरेदी करत आहेत. याचे कारण म्हणजे सोने जेवढे साधे तेवढी लेबर कॉस्ट कमी असते. म्हणजे एका अर्थाने गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. आता सरकारची जी हॉल मार्किंगची पॉलिसी आली आहे; त्यामुळे सोन्याचे रिटर्न पूर्ण मिळत आहेत. येत्या पाच वर्षांत सोने दुप्पट होईल. म्हणजे सोन्याचा भाव एक लाख होईल, असेदेखील कुमार जैन यांनी सांगितले.

प्लेन गोल्ड खरेदी करण्यास मिळणार प्राधान्य nजगभरातील खाणींमधून वर्षाला ३ हजार टन सोने काढले जाते. कच्चा तेलाच्या किमती जशा वाढतील तशा सोन्याच्या किमती वाढतात. काही कंपन्या कच्चे तेल खरेदी करतात आणि मोबदल्यात सोने देतात. यामुळे सोन्याच्या भावात वाढ होते. nआता सोहळे आणि उत्सव यामुळे सोन्याची मागणी जास्त असेल. दिवाळीत सोने साहजिकच मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जाईल. यात प्लेन गोल्ड खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे कुमार जैन यांनी सांगितले.

टॅग्स :सोनं