Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Rates: सोने खरेदीची सुवर्णसंधी, किमती आणखी उतरणार; घसरणीत खरेदीची साधा संधी!

Gold Rates: सोने खरेदीची सुवर्णसंधी, किमती आणखी उतरणार; घसरणीत खरेदीची साधा संधी!

भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या ३ महिन्यांत सोन्याच्या किमतींनी आणि गोल्ड ईटीएफने ३.५ टक्के नकारात्मक रिटर्न दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 07:31 AM2022-06-14T07:31:13+5:302022-06-14T07:31:26+5:30

भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या ३ महिन्यांत सोन्याच्या किमतींनी आणि गोल्ड ईटीएफने ३.५ टक्के नकारात्मक रिटर्न दिले आहेत.

Gold Rates today opportunity to buy gold prices will fall further | Gold Rates: सोने खरेदीची सुवर्णसंधी, किमती आणखी उतरणार; घसरणीत खरेदीची साधा संधी!

Gold Rates: सोने खरेदीची सुवर्णसंधी, किमती आणखी उतरणार; घसरणीत खरेदीची साधा संधी!

नवी दिल्ली :

भारतासह आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या ३ महिन्यांत सोन्याच्या किमतींनी आणि गोल्ड ईटीएफने ३.५ टक्के नकारात्मक रिटर्न दिले आहेत. असे असले तरीही २०२२ मध्ये सोन्याने धातू सोडून शेअर बाजारासह इतर मालमत्तांच्या तुलनेत उत्तम परतावा दिला आहे.

डॉलरची रुपयाच्या तुलनेत वाढलेली पत यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये आणखी काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता आहे. असे असले तरीही प्रत्येक मोठ्या घसरणीमध्ये सोने खरेदी करण्याचा सल्ला अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.

डॉलरच्या वाढलेल्या किमतीने सोने आपटले
- साधारणत: जेव्हा महागाई आणि व्याजदरात वाढ होते तेव्हा तेव्हा सोन्याच्या किमतीमध्ये वाढ होण्यास सुरुवात होते. मात्र यावेळी असे होताना दिसत नाही.
- सतत महागाई वाढूनही डॉलरची किंमत वाढल्याने सोन्याची मागणी कमी झाली आहे. सध्या तात्पुरत्या वेळेसाठी सोन्यावर दबाव राहू शकतो. 
- अमेरिकेत आर्थिक मंदीची शक्यता असल्याने दीर्घकाळासाठी सोन्याच्या किमतीत वाढ हाेईल. एप्रिल, मे महिन्यात गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक वाढली आहे.

अशी वाढली सोन्याची चमक
(सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट)
२६,३०० = २०१५  
२८,६२३  = २०१६ 
२९,६६७ = २०१७ 
३१,४३८=  २०१८
३५,२२०= २०१९ 
४८,६५१= २०२० 
४८,७२०= २०२१ 
५२,८००=  २०२२ 

गोल्ड ईटीएफचे रिटर्न
(रिटर्न टक्क्यांमध्ये)

१ महिन्यात        -२.१ 
३ महिन्यात        -३.५ 
२०२२ मध्ये        ६.५
एक वर्षामध्ये        ४.२ 
३ वर्षांत        १६.१ 
५ वर्षांत        ११.८ 

६.८%  पर्यंत रिटर्न गोल्ड ईटीएफने दिले 
३.५% घसरण ३ महिन्यांत गोल्ड ईटीएफमध्ये झाली

गोल्ड ईटीएफमध्ये या वर्षी गुंतवणूक
महिना    गुंतवणूक    एयूएम 
जाने.    -४५२    १७,८४०
फेब्रु.    -२४८    -१८,७७८
मार्च    -२०५    १९,२८१
एप्रिल    -१,१००    २०,४३०
मे    -२०३    २०,२६१
(गुंतवणूक कोटी रुपयांमध्ये)

०९% वाढली देशांतर्गंत बाजारात सोन्याची किंमत

Web Title: Gold Rates today opportunity to buy gold prices will fall further

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं