Lokmat Money > बिझनेस न्यूज > Gold Price Hike: नव्या वर्षात साेने हाेणार ६४ हजारी; मोठी झळाळी येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Gold Price Hike: नव्या वर्षात साेने हाेणार ६४ हजारी; मोठी झळाळी येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Gold Price Hike: लग्नाचा हंगाम असल्यामुळे सध्या सोन्याची मागणीही वाढली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 05:58 AM2022-12-16T05:58:35+5:302022-12-16T06:37:41+5:30

Gold Price Hike: लग्नाचा हंगाम असल्यामुळे सध्या सोन्याची मागणीही वाढली आहे.

Gold Rates will be on 64 thousand in New Year possible | Gold Price Hike: नव्या वर्षात साेने हाेणार ६४ हजारी; मोठी झळाळी येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Gold Price Hike: नव्या वर्षात साेने हाेणार ६४ हजारी; मोठी झळाळी येण्याचा तज्ज्ञांचा अंदाज


नवी दिल्ली : सोन्याला मोठी झळाळी आली आहे. सोन्याचा दर तब्बल २८ महिन्यांनंतर ५४ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या वर पोहोचला. नव्या वर्षात साेन्यात माेठी तेजी दिसणार असून ६४ हजार रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 

शेअर बाजारात पडझड होत असते त्यावेळी लोकांचा सोने खरेदीकडे कल असतो. याशिवाय लग्नाचा हंगाम असल्यामुळे सध्या सोन्याची मागणीही वाढली आहे.

प्लेन गोल्ड खरेदी करण्यास मिळणार प्राधान्य 
जगभरातील खाणींमधून वर्षाला ३ हजार टन सोने काढले जाते. कच्चा तेलाच्या किमती जशा वाढतील तशा सोन्याच्या किमती वाढतात. काही कंपन्या कच्चे तेल खरेदी करतात आणि मोबदल्यात सोने देतात. यामुळे सोन्याच्या भावात वाढ होते. 
आता सोहळे आणि उत्सव यामुळे सोन्याची मागणी जास्त असेल. दिवाळीत सोने साहजिकच मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जाईल. यात प्लेन गोल्ड खरेदी करण्यास प्राधान्य दिले जाईल.

आज सोन्यामध्ये ज्वेलरी यास मागणी आहे. मोती, कुंदन असे यात प्रकार आहेत. काही ग्राहक प्लेन गोल्ड खरेदी करत आहेत. याचे कारण म्हणजे सोने जेवढे साधे तेवढी लेबर कॉस्ट कमी असते. म्हणजे एका अर्थाने गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे. आता सरकारची जी हॉल मार्किंगची पॉलिसी आली आहे; त्यामुळे सोन्याचे रिटर्न पूर्ण मिळत आहेत. येत्या पाच वर्षांत सोने दुप्पट होईल. म्हणजे सोन्याचा भाव एक लाख होईल.

Web Title: Gold Rates will be on 64 thousand in New Year possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं