Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने पोहोचले ३८ हजार ५०० रुपयांवर

सोने पोहोचले ३८ हजार ५०० रुपयांवर

यावर्षी सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ३८ हजार ४७0 रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 06:38 AM2019-08-13T06:38:04+5:302019-08-13T06:38:37+5:30

यावर्षी सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ३८ हजार ४७0 रुपयांवर पोहोचला.

 Gold reached 38 thousand 500 rupees | सोने पोहोचले ३८ हजार ५०० रुपयांवर

सोने पोहोचले ३८ हजार ५०० रुपयांवर

मुंबई : यावर्षी सोन्याच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून, सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर ३८ हजार ४७0 रुपयांवर पोहोचला. यावर्षात सोन्याच्या दरात तब्बल २0 टक्के वाढ झाली आहे. या वर्षाअखेरीस सोन्याचा १0 ग्रॅम सोन्याचा दर ४0 हजार रुपयांचा टप्पा पार करेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
जानेवारीमध्ये सोन्याचा दर प्रति ग्रॅम ३१ हजार ४00 रुपये होता, तो आज ३८ हजार ४७0 रुपये झाला. भारत सोन्याची आयात करतो. त्यामुळे जागतिक बाजारपेठेनुसार सोन्याचे दर निश्चित होतात. डॉलरच्या तुलनेत रुपयांची घसरण व सोन्याच्या आयात शुल्कामध्ये झालेली वाढ हे दरवाढीचे कारण आहे.
सणासुदीचा काळ सुरू होत असून, त्यानंतर विवाहांचे मुहूर्त आहेत. या काळात सोन्याची मागणी अधिक असते. त्यामुळे पुढील काळात सोने आणखी महाग होत जाईल, असे सराफा व्यापाऱ्यांना वाटत आहे.

दागिने तर आणखी महाग

सोन्यावरील आयात शुल्क आधी १0 टक्के होते. निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात त्यात अडीच टक्के वाढ करण्यात आली. म्हणजेच आयात शुल्क १२.५ टक्क्यांवर गेले. त्याचाही परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. सोन्याचा दर ३८ हजार ४७0 रुपये असला तरी सामान्य लोक ते दागिन्याच्या रूपातच घेतात. दागिन्याच्या कर्णावळीचे दरही सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष एका तोळ्याचा दागिना विकत घेताना ३९ हजार ५00 रुपये मोजावे लागतात, असे ग्राहकाचे म्हणणे आहे.

Web Title:  Gold reached 38 thousand 500 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं