Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याची ५८० रुपयांनी उसळी

सोन्याची ५८० रुपयांनी उसळी

स्थानिक सराफांनी केलेल्या जोरदार खरेदीने गुरुवारी सोने ५८० रुपयांनी उसळून ३० हजारांचा पल्ला ओलांडत ३०,२५० रुपये प्रति १० ग्रॅम असा भाव गाठला. सोन्याचा हा गेल्या पाच

By admin | Published: June 17, 2016 03:34 AM2016-06-17T03:34:21+5:302016-06-17T03:34:21+5:30

स्थानिक सराफांनी केलेल्या जोरदार खरेदीने गुरुवारी सोने ५८० रुपयांनी उसळून ३० हजारांचा पल्ला ओलांडत ३०,२५० रुपये प्रति १० ग्रॅम असा भाव गाठला. सोन्याचा हा गेल्या पाच

Gold recovers by Rs 580 | सोन्याची ५८० रुपयांनी उसळी

सोन्याची ५८० रुपयांनी उसळी

नवी दिल्ली : स्थानिक सराफांनी केलेल्या जोरदार खरेदीने गुरुवारी सोने ५८० रुपयांनी उसळून ३० हजारांचा पल्ला ओलांडत ३०,२५० रुपये प्रति १० ग्रॅम असा भाव गाठला. सोन्याचा हा गेल्या पाच आठवड्यांतील सर्वोच्च दर आहे.
अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्याचा अनुकूल परिणाम परदेशातील बाजारावर झाला. तेथे सोन्याला जोरदार उठाव होता. परिणामत: स्थानिक व्यापाऱ्यांनीही भरपूर खरेदी केली. सोन्याप्रमाणेच चांदीही ७०० रुपयांनी उसळली आणि ४२ हजारांचा टप्पा ओलांडत ४२,०५० रुपये प्रतिकिलो झाली. (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Gold recovers by Rs 580

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.