Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने सावरले; पण चांदी काळवंडली

सोने सावरले; पण चांदी काळवंडली

आगामी लग्नाचा मोसम ध्यानात घेऊन दागिने विक्रेत्यांनी केलेली खरेदी तसेच परदेशातून मिळालेले मजबुतीचे संकेत यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेली सोन्याची घसरण बुधवारी थांबली.

By admin | Published: September 23, 2015 10:01 PM2015-09-23T22:01:35+5:302015-09-23T22:01:35+5:30

आगामी लग्नाचा मोसम ध्यानात घेऊन दागिने विक्रेत्यांनी केलेली खरेदी तसेच परदेशातून मिळालेले मजबुतीचे संकेत यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेली सोन्याची घसरण बुधवारी थांबली.

Gold recovers; But silver is black and white | सोने सावरले; पण चांदी काळवंडली

सोने सावरले; पण चांदी काळवंडली

नवी दिल्ली : आगामी लग्नाचा मोसम ध्यानात घेऊन दागिने विक्रेत्यांनी केलेली खरेदी तसेच परदेशातून मिळालेले मजबुतीचे संकेत यामुळे दोन दिवसांपासून सुरू असलेली सोन्याची घसरण बुधवारी थांबली. राष्ट्रीय राजधानीत सोन्याचा भाव ३० रुपयांनी वधारून २६,५४० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मात्र, विक्रीच्या दडपणाखाली चांदीचे भाव ६५५ रुपयांनी घसरून ३५,१७५ रुपये प्रतिकिलो असे झाले.
सिंगापुरात सोन्याचा भाव ०.२ टक्क्याने वाढून १,१२७.३५ डॉलर प्रति औंस झाला. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत रुपया महागल्याने आयातही महागली आहे. त्याचा अनुकूल परिणाम सोन्यावर झाला. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ सोन्याचा दर अनुक्रमे २६,५४० आणि २६,३९० रुपये झाला.

Web Title: Gold recovers; But silver is black and white

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.