नवी दिल्ली : जवाहिरे आणि व्यापारी यांच्याकडून मागणी वाढल्याने सोने मंगळवारी ८० रुपयांनी महागले. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे २७,२३० रुपये असा झाला. दुसरीकडे चांदी आणखी २५ रुपयांनी घसरून ३७,०७५ रुपये प्रतिकिलो अशी झाली.
गुरुवारी दसरा आहे. त्यानंतर पुढे १५ दिवसांत दिवाळी सुरू होत असल्याने ग्राहकांची मागणी वाढण्याची शक्यता आहे. ही बाब ध्यानात घेऊन व्यापाऱ्यांनी आज सोन्याची जोरदार खरेदी चालवली. त्यामुळे सोने आज १० ग्रॅममागे ८० रुपयांनी वधारले.देशांतर्गत बाजारासह आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याला चांगला भाव होता. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव ११७२.४० प्रति औंस असा झाला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही सोन्याचे भाव ८० रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,२३० रुपये आणि २७,०८० रुपये असे झाले. सोमवारी सोन्याचे भाव १०० रुपयांनी घसरले होते.कारखानदार आणि नाणे उत्पादक यांच्याकडून मागणी घटल्याने चांदी आणखी २५ रुपयांनी घसरली.
त्यामुळे चांदीचा भाव ३७,०७५ रुपये प्रतिकिलो झाला. चांदीच्या नाण्याचे भाव मात्र स्थिर राहिले. चांदीच्या १०० नाण्यांचा खरेदीचा दर ५२ हजार रुपये, तर विक्रीचा दर ५३ हजार रुपये कायम राहिला.
सोने सावरले; चांदीची घसरण सुरूच
जवाहिरे आणि व्यापारी यांच्याकडून मागणी वाढल्याने सोने मंगळवारी ८० रुपयांनी महागले. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅममागे २७,२३० रुपये असा झाला. दुसरीकडे चांदी आणखी
By admin | Published: October 21, 2015 04:15 AM2015-10-21T04:15:13+5:302015-10-21T04:15:13+5:30