Join us

सोने पुन्हा सावरले

By admin | Published: October 27, 2015 11:18 PM

व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केल्याने, तसेच जागतिक बाजारपेठेत असलेले अनुकूल वातावरण यामुळे गेल्या तीन दिवसांपासून झालेली सोन्याची घसरण मंगळवारी थांबली.

नवी दिल्ली : व्यापाऱ्यांनी खरेदी सुरू केल्याने, तसेच जागतिक बाजारपेठेत असलेले अनुकूल वातावरण यामुळे गेल्या तीन दिवसांपासून झालेली सोन्याची घसरण मंगळवारी थांबली. दहा ग्रॅममागे ४० रुपयांनी वधारून सोन्याचा भाव २७,११० रुपये झाला. औद्योगिक कारखाने आणि नाणे उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळेही चांदी १५ रुपयांनी महागली. चांदीचा किलोमागचा भाव ३७,१२५ रुपये झाला. नवरात्र, दसरा संपला. आता दिवाळीचे आणि लग्नाच्या हंगामाचे वेध लागले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सोने खरेदीस प्रारंभ केला आहे. त्यातच परदेशातही सोन्याला उठाव मिळाल्याने हा मौल्यवान धातू आज सावरल्याचे सूत्रांनी सांगितले. जागतिक पातळीवर सोने ०.२३ टक्क्यांनी वधारले. लंडन येथील बाजारात सोन्याचा भाव ११६५.६० डॉलर प्रति औंस असा झाला. चांदीही ०.३५ टक्क्यांनी महागून १५.९० डॉलर प्रति औंस झाली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही सोन्याचे भाव ४० रुपयांनी वाढून २७,११० रुपये झाले.