नवी दिल्ली: आपल्याकडे सोनं(Gold) असावं, अशी इच्छा प्रत्येकाची असते. सोनं गरजेच्या वेळी कामाला येणारी अतिशय महत्वाचे वस्तू आहे. त्यामुळेच अनेक देशही सोन्याचा मोठा साठा करुन ठेवत असतात. हेच सोनं आर्थिक संकटाच्या काळात देशाला सावरण्यासही मदत करते. देशाच्या मध्यवर्ती बँकेत सर्व सोन्याचा साठा ठेवला जातो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाही त्यांची मालमत्ता म्हणून रिझर्व्ह बँकेत सोनं जमा करावं लागतं. राजकीय दबावाचाही सोन्यावर विशेष परिणाम होत नाही, त्यामुळेच इतर कोणत्याही मालमत्तेच्या तुलनेत सोन्याला स्थिरता आहे.
जगातील टॉप-10 सोनं साठवण करणारे देश
जगाविषयी बोलायचे झाले तर, ज्या देशाकडे सोन्याचे सर्वाधिक साठे आहेत, तो देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड सोने आहे. गोल्डहबने एक अहवाल सादर केला असून त्यानुसार अमेरिकेत जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. चला जाणून घेऊया जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेले टॉप-10 देश कोणते आहेत आणि जगात भारताचा क्रमांक कुठे आहे?
क्रमांक 10
देश: नेदरलँड
सोन्याचा साठा: 612.45 टन
क्रमांक 9
देश: भारत
सोन्याचा साठा: 743.83 टन
क्रमांक 8
देश: जपान
सोन्याचा साठा: 845.97 टन
क्रमांक 7
देश: स्वित्झर्लंड
सोन्याचा साठा: 1,040 टन
क्रमांक 6
देश: चीन
सोन्याचा साठा: 1,948.31 टन
क्रमांक 5
देश: रशिया
सोन्याचा साठा: 2,298.53 टन
क्रमांक 4
देश: फ्रान्स
सोन्याचा साठा: 2,436.35 टन
क्रमांक 3
देश: इटली
सोन्याचा साठा: 2,451.84 टन
क्रमांक 2
देश: जर्मनी
सोन्याचा साठा: 3,359 टन
क्रमांक 1
देश: यूएसए
सोन्याचा साठा: 8,133.47 टन
(गोल्डहबच्या रिपोर्टप्रमाणे)