Join us

Gold Reserves: 'या' 10 देशांकडे आहे सोन्याचा सर्वाधिक साठा, भारताचा कितवा नंबर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 5:42 PM

Gold Reserves: सोन्याचा साठा ही कोणत्याही देशासाठी एक महत्त्वाची संपत्ती असते. ही संपत्ती आर्थिक संकटात देशासाठी मोलाची कामगिरी करते.

नवी दिल्ली:  आपल्याकडे सोनं(Gold) असावं, अशी इच्छा प्रत्येकाची असते. सोनं गरजेच्या वेळी कामाला येणारी अतिशय महत्वाचे वस्तू आहे. त्यामुळेच अनेक देशही सोन्याचा मोठा साठा करुन ठेवत असतात. हेच सोनं आर्थिक संकटाच्या काळात देशाला सावरण्यासही मदत करते. देशाच्या मध्यवर्ती बँकेत सर्व सोन्याचा साठा ठेवला जातो. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनाही त्यांची मालमत्ता म्हणून रिझर्व्ह बँकेत सोनं जमा करावं लागतं. राजकीय दबावाचाही सोन्यावर विशेष परिणाम होत नाही, त्यामुळेच इतर कोणत्याही मालमत्तेच्या तुलनेत सोन्याला स्थिरता आहे.

जगातील टॉप-10 सोनं साठवण करणारे देशजगाविषयी बोलायचे झाले तर, ज्या देशाकडे सोन्याचे सर्वाधिक साठे आहेत, तो देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध आहे. जगात असे अनेक देश आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड सोने आहे. गोल्डहबने एक अहवाल सादर केला असून त्यानुसार अमेरिकेत जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा आहे. चला जाणून घेऊया जगातील सर्वात जास्त सोन्याचा साठा असलेले टॉप-10 देश कोणते आहेत आणि जगात भारताचा क्रमांक कुठे आहे?

क्रमांक 10देश: नेदरलँडसोन्याचा साठा: 612.45 टन

क्रमांक 9देश: भारतसोन्याचा साठा: 743.83 टन

क्रमांक 8देश: जपानसोन्याचा साठा: 845.97 टन

क्रमांक 7देश: स्वित्झर्लंडसोन्याचा साठा: 1,040 टन

क्रमांक 6देश: चीनसोन्याचा साठा: 1,948.31 टन

क्रमांक 5देश: रशियासोन्याचा साठा: 2,298.53 टन

क्रमांक 4देश: फ्रान्ससोन्याचा साठा: 2,436.35 टन

क्रमांक 3देश: इटलीसोन्याचा साठा: 2,451.84 टन

क्रमांक 2देश: जर्मनीसोन्याचा साठा: 3,359 टन

क्रमांक 1देश: यूएसएसोन्याचा साठा: 8,133.47 टन

(गोल्डहबच्या रिपोर्टप्रमाणे)

टॅग्स :सोनंभारतअमेरिकाइटली