जळगाव : भारतीय रु पयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर वधारण्यासह आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढल्याने सोन्याच्या भावात ५०० रुपये प्रतितोळ्याने वाढ झाली आहे. यामुळे सोने ४७ हजार २०० रुपयांवरून ४७ हजार ७०० रु पयांवर पोहोचले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून ४९ हजार रुपयांवर स्थिर असलेली चांदी मात्र त्याच भावावर स्थिर आहे.
खरेदीला आता प्रतिसाद मिळू लागला. चांदीची आवक कमी असल्याने ५० हजार रुपये किलोवर पोहोचली होती. सुवर्णबाजार सुरू होऊन मोड येणे सुरू झाले व भाव कमी होऊ लागले. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी चांदीचे भाव दीड हजार रुपये प्रतिकिलोने घसरले व ती ४८ हजार ५०० रु पयांवर आली. मात्र ८ जून रोजी त्यात ५०० रुपयांची वाढ झाली ती ४९ हजारावर पोहचली.तेव्हापासून चांदी याच भावावर स्थिर आहे.खरेदीस प्रतिसादगेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या सुवर्णबाजारात सोने-चांदीच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाववाढ होत असली तरी खरेदी सुरू असल्याचे सकारात्मक चित्र सुवर्णनगरीत आहे.--------कोटआंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वाढत असल्याने आपल्याकडेही ही भाववाढ होत आहे. खरेदीला प्रतिसाद आहे.- सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक.भारतीय रु पयाच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे दर वाढल्याने सोन्याच्या भावात वाढ होत आहे. सध्या बाजारात सकारात्मक चित्र आहे.- स्वरु प लुंकड, सचिव, जळगाव सराफ बाजार असोसिएशनच्कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सुवर्ण बाजारावर आंतरराष्ट्रीय पातळीवरही परिणाम झाला होता. त्यानंतर स्थिती सुरळीत होत असताना आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारले आहेत. त्यामुळे भारतातही त्याचा परिमाम झाला.च्डॉलरच्या दरामध्ये वाढ होऊन तो ७५.८१ रु पयांवर पोहोचल्यानेही सोन्याचे भाव वाढण्यास मदत होत आहे. यामुळे ४७ हजार २०० रु पयांवर असलेल्या सोन्याच्या भावात ५०० रु पयांनी वाढ झाली व ते ४७ हजार ७०० रु पयांवर पोहोचले.