नवी दिल्ली : सण आणि आगामी लग्नसराईमुळे सराफांकडून मागणी वाढल्यामुळे सोमवारी सोने १० ग्रॅममागे १७० रुपयांनी वधारून २६,८७० रुपयांवर गेले. गेल्या दीड महिन्यात झालेली ही सगळ्यात मोठी वाढ आहे. औद्योगिक पट्ट्यातून आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे चांदी किलोमागे २७५ रुपयांनी महाग होऊन ३७,००० रुपयांवर पोहोचली.
विदेशी बाजारपेठेतही सोन्याला मागणी असल्यामुळे तेथेही सोने सात आठवड्यांतील सर्वाधिक किमतीला गेले. सिंगापूरची बाजारपेठच बहुतेकदा येथील बाजारात सोन्याचे भाव ठरविते. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह पुढील वर्षापर्यंत व्याजदर वाढवणार नसल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सिंगापूरमध्ये एक औंस सोने ०.२ टक्क्यांनी वाढून १,१५८.२० अमेरिकन डॉलर झाले. चांदीही ०.८८ टक्क्यांनी वाढून होऊन औंसमागे १५.९६ अमेरिकन डॉलर झाली.
येथील बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने १० ग्रॅममागे १७० रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,८७० व २६,७२० रुपये झाले. हे भाव गेल्या आॅगस्टमध्ये होते. शनिवारी सोने १०० रुपयांनी वधारले होते. आठ ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्याच्या भावातही २०० रुपयांची वाढ होऊन ते २२,४०० रुपये झाले. वीकली बेस्ड् डिलिव्हरीची चांदी किलोमागे ३३० रुपयांनी वाढून ३७,१६० रुपये झाली. चांदीच्या १०० नाण्यांचा भाव एक हजार रुपयांनी वाढून खरेदीसाठी ५२,००० व विक्रीसाठी ५३,००० रुपये झाला.
सोने १७०, तर चांदी २७५ रुपयांनी वधारली
सण आणि आगामी लग्नसराईमुळे सराफांकडून मागणी वाढल्यामुळे सोमवारी सोने १० ग्रॅममागे १७० रुपयांनी वधारून २६,८७० रुपयांवर गेले.
By admin | Published: October 12, 2015 10:21 PM2015-10-12T22:21:22+5:302015-10-12T22:21:22+5:30