Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका आठवड्यात सोने २,५०० रुपयांनी महागले; MCXवर एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर

एका आठवड्यात सोने २,५०० रुपयांनी महागले; MCXवर एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर

देशांतर्गंत बाजारात नवरात्रीमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ पहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 10:39 AM2022-10-08T10:39:02+5:302022-10-08T10:39:57+5:30

देशांतर्गंत बाजारात नवरात्रीमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ पहायला मिळाली.

gold rose by rs 2500 in a week at a one month high on mcx | एका आठवड्यात सोने २,५०० रुपयांनी महागले; MCXवर एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर

एका आठवड्यात सोने २,५०० रुपयांनी महागले; MCXवर एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली/जळगाव: देशांतर्गंत बाजारात नवरात्रीमध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ पहायला मिळाली. गेल्या एका आठवड्यात सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम २५०० रुपयांनी वाढली आहे, तर दिवाळीसोबतच लग्नाचा हंगाम येण्यामुळे सोन्याची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. रोखे उत्पन्नातील घसरण आणि ढासळलेल्या रुपयाने सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. एमसीएक्सवर वायदा सोना एक महिन्याच्या उच्चांकी स्तरावर आहे.

पुढील काही महिन्यांमध्ये सणासुदीचा काळ लक्षात घेता तसेच मंदीचे सावट आल्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळण्याची शक्यता असल्याने भारतात सोन्याच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सोन्यावर अधिक प्रीमियम मिळत असल्याने बँकांनी भारतसोडून चीन आणि तुर्कीसारख्या देशांमध्ये सोने विक्री सुरू केली आहे. बँकांकडे अधिक प्रमाणात सोने साठा नाही. त्यामुळे सणासुदीत सोने आणखी महाग होण्याची शक्यता आहे. बँकांनी चीन आणि तुर्कीला पुरवठा वाढवल्याने देशात सोन्याचा तुडवडा जाणवू लागला आहे.

सोन्याच्या भावात ११०० रुपयांची वाढ

विजयादशमीच्या मुहूर्तानंतर दुसऱ्या दिवशी घसरण झालेल्या सोने-चांदीच्या भावात शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. सोन्याच्या भावात एकाच दिवसात एक हजार १०० रुपयांची वाढ होऊन ते जळगावमध्ये ५२ हजार ४०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले आहे. तसेच चांदीत ३०० रुपयांची वाढ होऊन ती पुन्हा ६२ हजार रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.

अशी वाढली सोन्याची किंमत
२८ सप्टें.   नवा भाव  वाढ
मुंबई    ४९,४७०    ५२,४००     २६३० 
चेन्नई     ५०,४५०     ५२,७५०    २३०० 
नवी दिल्ली    ५०,१३०    ५२,२५०    २१२० 
प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट किंमत रुपयात

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: gold rose by rs 2500 in a week at a one month high on mcx

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Goldसोनं