Lokmat Money > बिझनेस न्यूज > सहा दिवसांत सोने १,२१० रुपयांनी वधारले

सहा दिवसांत सोने १,२१० रुपयांनी वधारले

सोन्याच्या किमती वाढण्याचा क्रम शुक्रवारी सलग सातव्या दिवशीही कायम होता. सोन्याचा भाव १० ग्र्रॅममागे १० रुपयांनी वाढून २६,२०० रुपयांवर गेला. दागिने निर्मात्यांकडून

By admin | Published: August 15, 2015 01:28 AM2015-08-15T01:28:29+5:302015-08-15T01:28:29+5:30

सोन्याच्या किमती वाढण्याचा क्रम शुक्रवारी सलग सातव्या दिवशीही कायम होता. सोन्याचा भाव १० ग्र्रॅममागे १० रुपयांनी वाढून २६,२०० रुपयांवर गेला. दागिने निर्मात्यांकडून

Gold rose by Rs 1,210 in six days | सहा दिवसांत सोने १,२१० रुपयांनी वधारले

सहा दिवसांत सोने १,२१० रुपयांनी वधारले

नवी दिल्ली : सोन्याच्या किमती वाढण्याचा क्रम शुक्रवारी सलग सातव्या दिवशीही कायम होता. सोन्याचा भाव १० ग्र्रॅममागे १० रुपयांनी वाढून २६,२०० रुपयांवर गेला. दागिने निर्मात्यांकडून वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारात सोन्याला आलेली बळकटी यामुळे येथील बाजारात सोने गेल्या महिनाभरातील सर्वोच्च किमतीवर पोहोचले. सोन्याचा भाववाढीचा हा कल चांदीनेही घेत सलग आठव्या दिवशी कायम राखत किलोमागे ३० रुपयांची वाढ घेत ३६,१३० रुपयांवर गेली.
सणासुदीच्या दिवसांतील वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी दागिने व्यावसायिकांकडून मागणी वाढल्यामुळे व जागतिक बाजारातही सोन्याने घट्ट पाय रोवल्यामुळे येथील सोने वधारले. सिंगापूरच्या बाजारात औंसमागे सोने ०.२ टक्क्यांनी वाढून १,११६.९१ अमेरिकन डॉलरवर गेले. डॉलरच्या तुलनेत रुपया शुक्रवारी खाली आला (६५.३४ रुपये) त्यामुळे आयात महाग झाली व सोन्याचा भाव वाढला. राजधानी दिल्लीच्या बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा भाव १० ग्र्रॅममागे १० रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,२०० व २६,०५० रुपये झाला. गेल्या ६ दिवसांत सोने १,२१० रुपयांनी वधारले. ८ ग्रॅमच्या सुवर्ण नाण्याचा भाव २२,४०० रुपये मात्र बदलला नाही. चांदी (तयार) किलोमागे ३० रुपयांनी वाढून ३६,१३० व वीकली बेस्ड् डिलिव्हरी तत्त्वावरील चांदी ६५ रुपयांनी महाग होऊन ३५,९४० रुपयांवर गेली. चांदीच्या नाण्यांचा (१०० नग) भाव खरेदीसाठी १ हजारांनी वाढून ५१ हजार रुपये, तर विक्रीसाठी ५२ हजार रुपये झाला.

Web Title: Gold rose by Rs 1,210 in six days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.