नवी दिल्ली : सलग आठव्या सत्रात तेजीची नोंद करताना राजधानी दिल्लीत सोने २0 रुपयांच्या वाढीसह २६,२२0 रुपये तोळा झाले. दागिने निर्मात्यांनी केलेल्या खरेदीचा लाभ सोन्याला झाला. चांदी २७0 रुपयांनी वाढून ३६,४00 रुपये किलो झाली.
हंगामी मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांनी बाजारात खरेदी सुरू केली आहे. याशिवाय चीनने आपल्या सोन्या-चांदीच्या साठ्यात वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून बाजारातील धारणा मजबूत झाली आहे. जागतिक बाजारात सोने तेजीत असल्याचे दिसून आले. सिंगापूर येथे सोने 0.४ टक्क्यांनी वाढून १,११९.२0 डॉलर प्रति औंस झाले. चांदी 0.४ टक्क्यांनी वाढून १५.३0 डॉलर प्रति औंस झाली.
दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी २0 रुपयांनी वाढून अनुक्रमे २६,२२0 रुपये आणि २६,0७0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. गेल्या ७ दिवसांत सोने १,२२0 रुपयांनी वाढले आहे. सोन्याच्या गिन्नीचा भाव २२,४00 रुपये असा आदल्या दिवशीच्या पातळीवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव २७0 रुपयांनी वाढून ३६,४00 रुपये किलो झाला. साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव मात्र ४0 रुपयांनी घटून ३५,९00 रुपये किलो झाला.
सोने सलग ८ व्या दिवशी तेजीत
सलग आठव्या सत्रात तेजीची नोंद करताना राजधानी दिल्लीत सोने २0 रुपयांच्या वाढीसह २६,२२0 रुपये तोळा झाले. दागिने निर्मात्यांनी केलेल्या खरेदीचा लाभ
By admin | Published: August 17, 2015 11:22 PM2015-08-17T23:22:26+5:302015-08-17T23:22:26+5:30