Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोन्याने गाठला तीन महिन्यांचा उच्चांक

सोन्याने गाठला तीन महिन्यांचा उच्चांक

लग्नाचा हंगाम ध्यानात घेऊन सराफांनी चालविलेली खरेदी यामुळे सोने मंगळवारी ११५ रुपयांनी वधारून २७,३00 रुपये प्रति १0 ग्रॅम या तीन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचले.

By admin | Published: February 3, 2016 02:56 AM2016-02-03T02:56:06+5:302016-02-03T02:56:06+5:30

लग्नाचा हंगाम ध्यानात घेऊन सराफांनी चालविलेली खरेदी यामुळे सोने मंगळवारी ११५ रुपयांनी वधारून २७,३00 रुपये प्रति १0 ग्रॅम या तीन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचले.

Gold rose to three-month highs | सोन्याने गाठला तीन महिन्यांचा उच्चांक

सोन्याने गाठला तीन महिन्यांचा उच्चांक

नवी दिल्ली : जागतिक बाजारात मिळालेले पाठबळ आणि आगामी लग्नाचा हंगाम ध्यानात घेऊन सराफांनी चालविलेली खरेदी यामुळे सोने मंगळवारी ११५ रुपयांनी वधारून २७,३00 रुपये प्रति १0 ग्रॅम या तीन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचले.
त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घटल्याने आयात महागली. त्यातही परिणाम सोन्याचे भाव वाढण्यावर झाला. सोने महागले असले तरीही चांदी मात्र ६0 रुपयांनी घसरून ३४,८७0 रुपये प्रतिकिलो झाली.
औद्योगिक कारखाने आणि नाणे उत्पादकांकडून मागणी नसल्याने चांदी घसरली.
राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही शुद्धतेच्या सोन्याचे भाव ११५ रुपयांनी वधारून अनुक्रमे २७,३00 आणि २७,१५0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. गेल्या तीन महिन्यांतील हा सर्वोच्च स्तर असून, गेल्या वर्षी २१ आॅक्टोबर रोजी सोन्याचा हा भाव होता. गेल्या दोन दिवसांत सोने १३५ रुपयांनी महागले आहे.
चांदी घसरली असली तरी नाण्याचे भाव मात्र सोमवारचेच कायम राहिले. १00 नाण्याच्या खरेदीचा भाव ५0 हजार रुपये, तर विक्रीचा भाव ५१ हजार रुपये कायम राहिला.

Web Title: Gold rose to three-month highs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.