जळगाव - उच्चांकीवर पोहोचून मंगळवारी, २ एप्रिलला सोन्याचे भाव ५५० रुपयांनी घसरून १५० रुपयांनी वाढले. त्यानंतर सोन्याच्या भावात बुधवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाल्याने सोने ६९ हजार ५०० रुपये प्रति तोळा झाले.
चांदीचे भाव ७६ हजार रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. सोमवारी सोन्याच्या भावात ९०० रुपयांनी वाढ झाली होती. मंगळवारी ५५० रुपयांची घसरणीनंतर दुपारच्या सत्रात त्यात १५० रुपयांची वाढ होत, सोने ६९ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले होते. बुधवारी पुन्हा ५०० रुपयांची भाववाढ झाली. त्यामुळे एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह आता ७१ हजार ५८५ रुपये मोजावे लागणार आहेत.