Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने २५, चांदी १०० रुपयांनी वधारली

सोने २५, चांदी १०० रुपयांनी वधारली

परदेशात तेजी असतानाच अलंकार निर्मात्यांकडून खरेदी वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव चढा राहिला. सोमवारी १० गॅ्रममागे २५ रुपयांची वाढ

By admin | Published: August 11, 2015 03:16 AM2015-08-11T03:16:05+5:302015-08-11T03:16:05+5:30

परदेशात तेजी असतानाच अलंकार निर्मात्यांकडून खरेदी वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव चढा राहिला. सोमवारी १० गॅ्रममागे २५ रुपयांची वाढ

Gold, silver and silver rose by Rs 100 | सोने २५, चांदी १०० रुपयांनी वधारली

सोने २५, चांदी १०० रुपयांनी वधारली

नवी दिल्ली : परदेशात तेजी असतानाच अलंकार निर्मात्यांकडून खरेदी वाढल्यामुळे दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव चढा राहिला. सोमवारी १० गॅ्रममागे २५ रुपयांची वाढ झाल्यामुळे तो २५ हजार २०० रुपये झाला.
अलंकार निर्माते आणि फुटकळ व्यावसायिकांच्या खरेदीमुळे सोन्याच्या भावाला तेजी आली. औद्योगिक प्रतिष्ठाने व नाणी निर्मात्यांकडून मागणी वाढल्यामुळे चांदीचा भावही १०० रुपयांनी वाढून ३४ हजार ४०० रुपयांवर गेला.
सिंगापूरमध्ये सोन्याचा भाव ०.४ टक्क्यांनी वाढून १०९८.६२ डॉलर व चांदीचा भाव ०.९ टक्क्यांनी वाढून प्रति २८.३४ ग्रॅमला १४.९५ डॉलर एवढा झाला. दिल्लीत सोने ९९.९ आणि ९९.५ शुद्धतेचे भाव २५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २५,२०० आणि २५ हजार प्रति तोळावर बंद झाले. नाण्याचा भाव मात्र आधीच्याच २२,२०० रुपये प्रति आठ ग्रॅमवर बंद झाला.
राखाडी चांदीचा भाव किलोमागे १०० रुपयांनी वधारून ३४,४०० रुपये आणि चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव १६५ रुपयांनी वाढून ३४,१९५ रुपये किलोवर बंद झाला. मर्यादित व्यवसायादरम्यान चांदीच्या नाण्याचा भाव पूर्वीच्याच ४८ हजार ते ४९ हजार रुपये प्रति शेकडा या पातळीवर बंद झाला.

Web Title: Gold, silver and silver rose by Rs 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.