Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थमंत्र्यांचं भाषण संपताच सोन्याच्या दरात तब्बल १,२०० रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर

अर्थमंत्र्यांचं भाषण संपताच सोन्याच्या दरात तब्बल १,२०० रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर

gold and silver rate today 1st february 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपताच सोन्याच्या किंमतीत तब्बल १,२०० रुपयांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 02:52 PM2021-02-01T14:52:12+5:302021-02-01T14:59:18+5:30

gold and silver rate today 1st february 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपताच सोन्याच्या किंमतीत तब्बल १,२०० रुपयांची घसरण

Gold silver to become cheaper as FM proposes to cut customs duty | अर्थमंत्र्यांचं भाषण संपताच सोन्याच्या दरात तब्बल १,२०० रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर

अर्थमंत्र्यांचं भाषण संपताच सोन्याच्या दरात तब्बल १,२०० रुपयांची घसरण, जाणून घ्या लेटेस्ट दर

gold and silver rate today 1st february 2021 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपताच सोन्याच्या किंमतीत तब्बल १,२०० रुपयांची घसरण झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्स्चेंजवर (Multi commodity exchange) सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. 

अर्थमंत्र्यांनी सोनं आणि चांदीच्या आयात शुल्कात २.५ टक्क्यांनी घट करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बाजारात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सोने-चांदी खरेती करू इच्छिणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 

अर्थसंकल्प २०२१: काय झालं स्वस्त? काय महाग?

सोमवारी दुपारी १ वाजता सोन्याच्या दरात तब्बल १,२८६ रुपयांची घट झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्याचा भाव १,२८६ रुपयांच्या घसरणीसह ४८,१२३ रुपये इतका नोंदविण्यात आला आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. एक किलोग्रम चांदीचा भाव सध्या ७२,८७० रुपये इतका झाला आहे. 

तिजोरी भरण्यासाठी मोदी सरकार काय काय विकणार?; पाहा संपूर्ण यादी

दरम्यान, अर्थसंकल्प सादर होण्याआधी सोनं आणि चांदीच्या दरात वाढ झाली होती. MCX वेबसाइटच्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या सोन्याच्या दरात २७४ रुपयांची वाढ पाहायला मिळाली होती. सकाळी ९.०५ मिनिटांनी १८५ रुपयांच्या वाढीसह सोन्याचा भाव ४९,२८१ रुपये इतका होता. तर चांदीचा दरही १९४४ रुपयांच्या वाढीसह ७१,६५० रुपये इतका नोंदविण्यात आला होता. 

सोन्यावर सध्या १५ टक्क्यांहून अधिक कर
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याचा दरात कमालीची घसरण झाली. पण सध्या सोन्याच्या इम्पोर्ट ड्युटी खूप जास्त असल्याचं एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी सांगितलं. सध्या सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी १२.५ टक्के इतकी आहे. याशिवाय त्यावर ३ टक्के जीएसटी देखील आकारला जातो. 

Web Title: Gold silver to become cheaper as FM proposes to cut customs duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.