Join us  

सोने-चांदी तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2016 4:28 AM

सणासुदीच्या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी जोरदार खरेदी केल्यामुळे मंगळवारी सोने ५५ रुपयांनी वाढून ३१,१३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले.

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनी जोरदार खरेदी केल्यामुळे मंगळवारी सोने ५५ रुपयांनी वाढून ३१,१३0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे चांदी ५00 रुपयांनी वाढून ४७,000 रुपये किलो झाली. जागतिक बाजारातही तेजीचा कल दिसून आला. सिंगापूर येथील बाजारात सोने 0.६ टक्क्यांनी वाढून १,३४७.१६ डॉलर प्रति औंस, तर चांदी 0.५६ टक्क्यांनी वाढून १९.८५ डॉलर प्रति औंस झाली. राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी ५५ रुपयांनी वाढून अनुक्रमे ३१,१३0 रुपये आणि ३0,९८0 रुपये प्रति १0 ग्रॅम झाला. शनिवारी सोने २५ रुपयांनी वाढले होते. सोन्याच्या आठ ग्रॅम गिन्नीचा भाव २४,३00 रुपयांवर स्थिर राहिला. (लोकमत न्यूज नेटवर्क)