Join us

सोने- चांदीची पडझड सुरूच

By admin | Published: September 22, 2015 10:06 PM

परदेशी बाजारात असलेले नैराश्य आणि स्थानिक सराफांकडून कमी मागणी यामुळे सोमवारी सोने सलग दुसऱ्या दिवशी १५० रुपयांनी घसरून १० ग्रॅममागे २६,५१० रुपयांवर आले

नवी दिल्ली : परदेशी बाजारात असलेले नैराश्य आणि स्थानिक सराफांकडून कमी मागणी यामुळे सोमवारी सोने सलग दुसऱ्या दिवशी १५० रुपयांनी घसरून १० ग्रॅममागे २६,५१० रुपयांवर आले. चांदीही किलोमागे १७० रुपयांनी घसरून ३६ हजारांच्या खाली, म्हणजे ३५,८३० रुपयांवर आली.अमेरिकी फेडरल बँकेने सध्या व्याजदर वाढविले नसले तरीही वर्षअखेरपर्यंत व्याजदर वाढविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने परदेशात सोन्याचे भाव घसरले. त्याचा परिणाम स्थानिक बाजारावरही झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचे भाव ०.५७ टक्क्यांनी घसरून १,१३३.४० डॉलर प्रतिऔंस इतके झाले. त्याचा परिणाम भारतातही झाला. अमेरिकेतील घडामोडींचे भारतावर दडपण आल्याने सोमवारी सोन्याची मागणी कमी राहिली.राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ या दोन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव १० ग्रॅममागे १५० रुपयांनी घसरून अनुक्रमे २६,५१० आणि २६,३६० रुपये झाले.सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही १७० रुपयांची घसरण होऊन किलोचा दर ३५,८३० रुपये झाला. उद्योजक आणि नाणे उत्पादकांकडून चांदीची मागणी कमी झाली. चांदीच्या नाण्याच्या विक्री आणि खरेदीचा दर मात्र स्थिर राहिला.