नवी दिल्ली : जर तुम्ही सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी शोधत असाल तर आता एक चांगला काळ सिद्ध होऊ शकतो. गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. सोने पुन्हा एकदा प्रति दहा ग्रॅम 48 हजार रुपयांच्या खाली आले आहे. तर चांदी 68,000 रुपये प्रति किलोच्या खाली व्यवहार करत आहे.
Gold silver Price Today : मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर गुरुवारी दुपारी 1:30 वाजता ऑक्टोबरच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत (Gold Price Today) 47,903 रुपये होती. तर सप्टेंबरसाठी चांदीची किंमत 0.9 टक्क्यांनी घसरून 67,547 रुपये झाली.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (India Bullion And Jewellers Association) मते, गुरुवारी 999 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याची किंमत 49480 प्रति 10 ग्रॅम होती, तर 999 शुद्धतेच्या चांदीची किंमत 400 रुपये किलोने घसरली. आज चांदीची किंमत 67600 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
खरंतर, गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने 8,200 रुपयांनी स्वस्त मिळत आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सोन्याने 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा रेकॉर्ड पार केला होता. पण ऑगस्टपासून सोन्यात घट झाली आणि किंमत 43000 रुपयांपर्यंत पोहोचली. 1 जानेवारी रोजी सोने 50,300 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.
दरम्यान, गेल्या वर्षी सोन्याने गुंतवणूकदारांना प्रचंड रिटर्न दिले. कोरोना संकट काळात शेअर बाजार कोसळत होते आणि सोन्याचे भाव वाढत होते. जानेवारी -2020 मध्ये सोन्याचे मूल्य सुमारे 40000 रुपये प्रति 10 ग्रॅम होते, जे ऑगस्टमध्ये वाढून 56 हजारांवर गेले. जर तुम्हाला गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करायचे असेल तर अनेक पर्याय आहेत. डिजिटल पद्धतीने सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे. फिजिकल गोल्ड अर्थात दागिन्यांच्या तुलनेत गोल्ड बॉण्ड्स, गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करावी. भारतात गुंतवणुकीसाठी सोने हा एक विश्वासार्ह पर्याय आहे.
हॉलमार्क म्हणजे काय?सोन्यासाठी हॉलमार्किंग त्याच्या शुद्धतेचे वैशिष्ट्य आहे. भारतीय मानक ब्यूरो अर्थात बीआयएसद्वारे याची निश्चितता केली जाते. हे सोन्याच्या गुणवत्तेची पातळी तपासते. तसेच दागिने किंवा सोन्याच्या नाण्याच्या तपासणीसाठी या प्रयोगशाळांना परवाना दिला जातो. सोने आणि दागिन्यावर बीआयएसची हॉलमार्किंग असणे आवश्यक असते. त्यामुळे सोने खरेदी करताना हॉलमार्क आहे की नाही याची निश्चित चाचपणी करा.
हॉलमार्क कसा ओळखालं? सोन्याच्या हॉलमार्कमध्ये बीआयएसचे त्रिकोणी चिन्ह असते. तसेच, त्यावर हॉलमार्किंग केंद्राची एक खूण असते. त्यासोबतच सोन्याची शुद्धता, तो सोन्याचा दागिना कधी बनवला आहे, हे देखील त्यावर लिहिलेले असते.
दागिन्यांवर शुद्धतेचे प्रमाणपत्रप्रत्येक दागिने किंवा नाण्यावर त्याची शुद्धता लिहिलेली असते. 99 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिलेले आहे. तर 22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 आणि 21 कॅरेट सोन्याचे 875 असे लिहिलेले असते. या व्यतिरिक्त 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 आणि 14 कॅरेट दागिन्यांवर 585 असे लिहिलेले असते.