Gold Price Today: सोनं आणि चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. होळीच्या आधीच सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात धातूच्या किंमतीत झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्यानं सोमवारी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात (Gold Price) प्रति १० ग्रॅममागे ३०२ रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या किंमतीत (Silver Price) प्रति एककिलोमागे १ हजार ५३३ रुपयांची घट झाली आहे. HDFC सिक्यूरिटीजच्या माहितीनुसार, जागतिक स्तरावर सोन्याच्या किमतीतील घसरणीमुळे स्थानिक पातळीवरही सोन्याचे दर कमी झाले आहेत.
सोन्याचा लेटेस्ट भाव काय? (Gold Price on 22 March 2021)दिल्लीच्या सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात ३०२ रुपयांची घसरण होऊन प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४४ हजार २६९ रुपये इतका नोंदवला गेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव १.७३१ डॉलर प्रति औंस राहिला.
चांदीचा लेटेस्ट भाव काय? (Silver Price on 22 March 2021)चांदीच्या दरात तब्बल १ हजार ५३३ रुपयांची घट नोंदविण्यात आली असून एक किलो चांदीचा भाव ६५ हजार ३१९ रुपये इतका झाला आहे. याआधीच्या ट्रडिंग सेशमध्ये चांदीचा भाव ६६ हजार ८५२ रुपये इतका होता.
सोन्याच्या दरात घसरणीमागचं कारण काय?HDFC सिक्यूरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांच्या माहितीनुसार व्यापारी आणि गुंतवणुकदारांचं या आठवड्यात यूएस बॉण्डकडे लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीतवर आंतरराष्ट्रीय दबाव पाहायला मिळत आहे. यूएस बॉण्ड यील्ड्स आणि डॉलरच्या विक्रीमुळे सुरुवातीच्या काळात सोन्याच्या विक्रीत वाढ झालेलं पाहायला मिळालं होतं.
सोन्याच्या आयातीत घटसोन्याची आयात (Gold Import) आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये पहिल्या ११ महिन्यांमध्ये (एप्रिल-फेब्रुवारी) ३.३ टक्क्यांनी घट नोंदवली गेली. समोर आलेल्या आकडेवारीनुसार सोन्याची आयात कमी झाल्यामुळे देशाच आर्थिक नुकसान कमी करण्यात मदत होते. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात ११ महिन्यांमध्ये व्यापारातील नुकसान कमी होऊन ८४.६२ अब्ज डॉलर इतकं राहिलं आहे. गेल्या वर्षी हिच आकडेवारी तब्बल १५१.६२ अब्ज डॉलर इतकी होती.