Gold Silver Price 17 October: सोन्या-चांदीच्या दरात आजही मोठा बदल झाला आहे. करवा चौथच्या आधी म्हणजेच आज सोन्याच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय. सराफा बाजारात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १६० रुपयांनी वाढून ७६,७१३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याआधी बुधवारी तो ७६,५५३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला होता. सराफा बाजारात चांदीच्या दरात किलोमागे ९४४ रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव ९०,५६८ रुपये प्रति किलो ग्रॅम वर खुला झाला.
सोने आणि चांदीचे हे दर आयबीजेएनं जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाहीत. आपल्या शहरातील सोने-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असण्याची दाट शक्यता आहे.
१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर
आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १६० रुपयांनी वाढून ७६,४०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर दुसरीकडे सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव १४६ रुपयांनी वाढून ७०,२६९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
१८ कॅरेट सोन्याच्या दरातही वाढ
तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज १२० रुपयांनी वाढला असून तो ५७,५३५ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ९३ रुपयांनी वधारून ४४,८७७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.