Join us

Gold Silver Price 23 Aug: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पाहा किती रुपयांत मिळतंय १० ग्रॅम GOLD

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 1:50 PM

Gold Silver Price 23 Aug: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर

Gold Silver Price 23 Aug: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. सोन्याचा भाव २७४ रुपयांनी घसरून ७१,३२५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीही ७४८ रुपयांनी घसरून ८४०७२ रुपये प्रति किलोवर आली. गुरुवारी सोनं ७१५९९ रुपये आणि चांदी ८४,८२० रुपयांवर बंद झाली होती.

२३ कॅरेट सोन्याच्या आयबीजेए दराबद्दल (23 carat gold rate) बोलायचं झालं तर आज ते २७३ रुपयांनी स्वस्त होऊन ७१०३९ रुपये प्रति १० ग्रॅम झालं आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या दरातही २५१ रुपयांची घसरण झाली आहे. आज तो ६५३३४ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव २२५ रुपयांनी कमी होऊन ४३४९४ रुपये झाला आहे. तर आज १४ कॅरेट सोन्याचा भाव १६० रुपयांनी कमी होऊन ४१७२५ रुपये झाला.

विशेष म्हणजे सोन्या-चांदीचे हे दर आयबीजेएने जाहीर केले आहेत. यावर जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. आपल्या शहरातील सोन्या-चांदीच्या दरात १००० ते २००० चा फरक असू शकतो.

जीएसटीसह सोन्या-चांदीचे दर

जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याचा भाव (24 carat gold rate) आता ७३,४६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत ७३१७० रुपये झालीये. यामध्ये ३ टक्के जीएसटीनुसार २१३१ रुपयांची भर पडली आहे. २२ कॅरेट सोन्याबद्दल बोलायचं झालं तर आज ते जीएसटीसह ६७२९४ रुपयांवर पोहोचलंय. त्यावर १९६० रुपयांचा जीएसटीची भर पडलीये.

१६०४ रुपयांचा जीएसटी जोडल्यानंतर १८ कॅरेट सोन्याची किंमत (18 carat gold rate) आता ५५०९८ रुपये झाली आहे. त्यावर ज्वेलरी मेकिंग चार्ज आणि ज्वेलर्सचा नफा धरण्यात आलेला नाही. जीएसटीसह एक किलो चांदीचा भाव (Silver 1 kg rate) ८६५९४ रुपयांवर पोहोचला आहे.

टॅग्स :सोनंचांदी